Business Success Story : ताई तुझी बातच न्यारी..! आई-वडिलांशी खोटे बोलून सुरु केला बिजनेस ; आज तब्बल 500 कोटींची बनली मालकीण

Business Success Story : मित्रांनो बिझनेस मध्ये (Business News) यशस्वी होण्यासाठी समर्पण भाव असणे अतिशय आवश्यक ठरते. ऑस्ट्रेलियातील जेन लू या मुलीने देखील बिजनेसमध्ये (Business Idea) समर्पण दाखवल्यास काय होऊ शकते हे दाखवून दिले आहे.

या मुलीची कहाणी कोणासाठीही प्रेरणादायी ठरू शकते. अत्यंत साध्या कुटुंबातल्या लूने इतकं दैदिप्यमान यश (Success Story) संपादन केलं की संपूर्ण जगाने तिच्या यशाचा गाजावाजा करून स्वीकारला आहे. लूचे (Successful Person) पालक चीनमधून ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले.

त्यांचे सुरुवातीचे दिवस संघर्षात गेले आणि त्यांनी सिडनीमध्ये सफाई कामगार म्हणूनही काम केले. इतर सर्वांप्रमाणे, लूच्या पालकांनाही त्यांच्या मुलीचे सुरक्षित भविष्य हवे होते. लूने कंपनीत चांगली नोकरी करावी अशी जेनच्या पालकांची इच्छा होती. लूने (Successful Businessmen) अकाउंटंट व्हावे अशी त्यांची इच्छा होती.

तथापि, लूची स्वप्ने मोठी होती. तिला फक्त नोकरीपुरते मर्यादित राहायचे नव्हते. व्यवसायाच्या क्षेत्रात काहीतरी मोठं करायचं हे तिचं स्वप्न होतं पण आई-वडिलांना दुखवायचं नव्हतं. ही समस्या सोडवण्यासाठी लूने आई-वडिलांपासून लपवून हा व्यवसाय सुरू केला.

जेन तिच्या व्यवसायात गुंतलेली असतानाच ती एका प्रसिद्ध फर्ममध्ये अकाउंटंट म्हणून काम करत असल्याचे पालकांना समजले. जेन ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघून जायची पण कॅफे किंवा लायब्ररीत बसून स्टार्टअपची योजना आखत असे. लूने जवळपास दोन वर्षे हे सर्व आपल्या पालकांपासून लपवून ठेवले होते.

गॅरेजमध्ये टाकलं कपड्यांचे दुकान :- 2010-11 मध्ये त्यांनी त्यांच्या गॅरेजमध्ये कपड्यांचे दुकान उघडले. काही महिन्यांनंतर, जेन यातून बाहेर गेली आणि एका गोदामात दुकान थाटले. यावेळी त्यांच्या मनात ऑनलाइन कपडे विकण्याचा विचार आला. यानंतर शोपो ही कंपनी सुरू झाली. लूची कंपनी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होऊ लागली. 2012 पर्यंत या कंपनीचे सोशल मीडियावर 20,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स होते.

सुरुवातीला अपयश :- लूला सहज यश मिळाले असे नाही.  एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘पहिल्या प्रयत्नात काही लाख रुपयांचे नुकसान झाले होते, पण नंतर तिला मॉलमधून मोठ्या प्रमाणात कपडे होलसेल मिळू लागले. हे कपडे विकल्यानंतर मॉलला पैसे द्यावे लागत. सुरुवातीला, जेनने तिच्या व्यवसायाची सर्व कामे स्वतःच केली. यामध्ये फेसबुकवर ऑर्डर घेणे, कपडे पॅकिंग करण्यापासून ते डिलिव्हरीपर्यंतचा समावेश आहे. यादरम्यान तिच्या प्रियकरानेही तिला साथ दिली.

यशस्वी बनून इतिहास रचला :- आज लूचा व्यवसाय 120 देशांमध्ये पसरला आहे. शोपो हा जगातील एक प्रसिद्ध फॅशन ब्रँड आहे. अकाउंटंटची नोकरी सोडलेली लू आज 500 कोटींहून अधिकची मालकिन बनली आहे. ती आलिशान घरे, आलिशान वाहनांचीही मालकीण आहे. 2016 मध्ये फोर्ब्सने लूचे नाव या यादीत समाविष्ट केले होते.