शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर, अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची निवड !

MHLive24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी जगदिश सावंत यांची निवड  झाली आहे. (Board of Trustees of Shirdi Sansthan announced, MLA Ashutosh Kale elected as President!)

गेल्या अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या शिर्डी संस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष व विश्वस्त पदाची यादी आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. 

यामध्ये अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षदी जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

Advertisement

विश्वस्त म्हणून अनुराधा आदिक, सुहास आहेर, अविनाश दंडवते,  सचिन गुजर, राहुल कनाल,  सुरेश वाबळे,

 जयंवतराव जाधव, महेंद्र शेळके, एकनाथ गोंदकर, तर शिर्डी नगरपंचायत अध्यक्षा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

कोण आहेत आशुतोष काळे? 

Advertisement

35 वर्षीय आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र, तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू. 

त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची धुरा आहे. आता त्यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker