MHLive24 टीम, 04 जानेवारी 2022 :- नवनवीन वाहने खरेदी करण्याचा आपल्या सगळ्यांनाच मोठा छंद असतो. हि इलेक्ट्रिक वाहने बनवण्यात मात्र चिनी कंपन्या फार पुढे आहेत.(Aion LX Plus)

इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) शर्यतीत चिनी कंपन्या प्रचंड वेग दाखवत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, चीनच्या GAC समूहाने Aion ब्रँड अंतर्गत त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केलीय . नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) एक SUV आहे.

त्याला Aion LX Plus म्हणतात. SUV 1000 किलोमीटरची शक्तिशाली रेंज ऑफर करते आणि लवकरच ती लॉन्च होणार आहे.

या वर्षी नोव्हेंबरमध्ये, GAC ने Guangzhou Auto Show मध्ये Aion LX Plus ची घोषणा केली. आता कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे की, त्यांची नवीन SUV 6 जानेवारी 2021 ला लॉन्च केली जाईल.

Gizmochina च्या मते, ही इलेक्ट्रिक SUV GAC Aion LX ची सुधारित आवृत्ती आहे. 2019 मध्ये याची घोषणा करण्यात आली होती. चायना लाइट ड्युटी व्हेईकल टेस्ट सायकल (CLTC) मध्ये SUV ची ऑपरेशनल रेंज 1,000 किमी पेक्षा जास्त होती.

एसयूव्ही चा विचार करता ही एक प्रभावी रेंज असणारी कार आहे. या कारमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कारमधील मोठी बॅटरी आहे. कारची बॅटरी GAC तंत्रज्ञानावर बनवली आहे.

त्याच्या टॉप एंड मॉडेलची क्षमता 144.4 kWh आहे. यामुळे, ती सामान्य बॅटरीपेक्षा 20 टक्के लहान आणि 14 टक्के हलकी बनते. ही बॅटरी 205Wh/kg ची ऊर्जा घनता देखील देते.

या इलेक्ट्रिक SUV च्या बाकी वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले, तर यात ड्युअल इलेक्ट्रिक मोटर आहे. हे 225 हॉर्स पावरचे उत्पादन करते आणि ही पावर दोन-स्पीड गिअरबॉक्सद्वारे वाहनाच्या चारही चाकांमध्ये प्रसारित केली जाते.

Aion LX Plus फक्त 2.9 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठू शकते. GAC ग्रुपने ग्वांगझो ऑटो शो 2021 मध्ये तीन इलेक्ट्रिक कार संकल्पना सादर केल्या. यापैकी Aion LX Plus सध्या लॉन्च होत आहे. TIME आणि EMKOO नावाच्या कॉन्सेप्ट कारबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Aion LX Plus SUV ला जागतिक बाजारात लॉन्च करण्याबाबत कंपनीने अजून काहीही सांगितले नाही. या कारची इतर वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आपल्याला ६ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. गेल्या महिन्यातच, जपानी ऑटोमेकर सुबारू कॉर्पने आपली पहिली सर्व-इलेक्ट्रिक SUV ‘Solterra’ कार जगासमोर सादर केलीय.

ही ऑल इलेक्ट्रिक एसयूव्ही कंपनीने टोयोटा मोटर कॉर्पसोबत संयुक्तपणे विकसित केली आहे. त्यांचे नवीन मॉडेल पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत टोयोटाच्या bZ4X सोबत यूएस, कॅनडा, युरोप, चीन आणि जपानमध्ये विकले जाणार असल्याची माहिती आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit