सेक्स केल्यानंतर बॉयफ्रेंडने सांगितली ती गोष्ट आणि आनंदाचे दु: खात झाले रूपांतर …..

शेवटी, इतके दिवस दूर राहिल्यानंतर, आम्हाला भेटण्याची संधी मिळाली आणि त्या दिवशी आम्ही दोघांनीही शारीरिक संबंध ठेवले होते. खूप दिवसांनी मला माझ्या प्रियकरासोबत वेळ घालवताना अतिशय आनंद झाला पण अचानक माझ्या आनंदाचे दु: खात रूपांतर झाले.

कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर असतो आणि जेव्हा तो विश्वास तुटतो तेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे तुटलेली असते. बेवफाई असो किंवा नात्यात खोटे बोलणे, दोन्ही प्रकरणांमध्ये जोडीदाराला माफ करणे खूप कठीण होते. एका ब्रिटीश महिलेची तिच्या जोडीदाराकडून अशीच फसवणूक झाली आहे की, ती त्यांचे नाते संपुष्टात आणायचे की पुढे न्यायचं हेच तिला कळत नाहीये.

महिलेने लिहिले, ‘मी २७ वर्षांची आहे आणि माझा प्रियकर ३१ वर्षांचा आहे. आम्ही फोनवर बोलायचो पण गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो. आम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो आणि दोन महिने भेटल्याशिवाय राहणे हे आमच्या दोघांसाठी एक कठीण काम होते.

Advertisement

‘शेवटी, इतके दिवस दूर राहिल्यानंतर, आम्हाला भेटण्याची संधी मिळाली आणि त्या दिवशी आम्ही दोघांनीही शारीरिक संबंध ठेवले होते. खूप दिवसांनी मला माझ्या प्रियकरासोबत वेळ घालवताना अतिशय आनंद झाला पण अचानक माझ्या आनंदाचे दु: खात रूपांतर झाले.

‘माझ्या प्रियकराने दुसऱ्या दिवशी सकाळी मला सांगितले की, त्याला नागीण (हर्पिस) झाली आहे. हे ऐकून मी पूर्णपणे स्तब्ध झाले. मला खूप राग येत होता त्याने सेक्स करण्यापूर्वी मला हे का सांगितले नाही. नागीण एक लैंगिक संक्रमित संसर्ग आहे आणि मला वाटले की, त्याने माझी फसवणूक केली आहे.

‘त्याला हा आजार आहे हे कळल्यावर आम्ही ठरवले की, यापुढे आम्ही शारीरिक संबंध ठेवणार नाही आणि आधी एकमेकांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जरी तो वारंवार सांगत आहे की, तो माझ्यापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही. त्याने सांगितले की त्याने त्याचं औषध घेणंही बंद केले आहे.

Advertisement

‘माझा प्रियकर सतत माझे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणतो की, तो पुन्हा कधीही असुरक्षित संभोग करणार नाही आणि त्याची औषधेही घेईल. एवढेच नाही तर तो म्हणतो की, जरी मी सहमत नसले तर आपण दोघेही लग्न करू शकतो. मात्र, मला या सर्व गोष्टी बेजबाबदार आणि बकवास वाटतात.

मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याला माझं ऐकायचंच नाहीये. असे दिसते की, त्याला फक्त स्वतःची काळजी आहे. जेव्हापासून मी त्याच्या आजाराबद्दल ऐकले तेव्हापासून मी खूप अस्वस्थ झाली आहे. एवढंच नाही तर मी माझ्या नागीण रक्त तपासणीची अपॉईंटमेंट घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

‘मी माझ्या प्रियकरावर नितांत प्रेम करते पण असं वाटतंय की, आता हे नातं संपल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच शिल्लक राहिलेला नाही. जर मलाही नागीण झाली तर संपूर्ण आयुष्य मी एकाकीच जगेन. मी खूपच चिंतेत आहे. या दिवसांत मी धड खातही नाहीये आणि झोपतही नाही. कृपया मला सांगा की, आता मला काय करायला हवं?’

Advertisement

या महिलेला सल्ला देताना एका तज्ज्ञाने लिहिलंय, नागीण हा अतिशय सामान्य आजार आहे. यासाठी तुम्हाला तुमची सेक्शुअल रिलेशनशीप थांबविण्याची गरज नाहीये. तुमचा प्रियकर आपल्या आजाराविषयी सांगण्याबाबत संकोच करत असावा आणि म्हणूनच त्याने तुम्हाला ही गोष्ट पहिल्यांदा सांगितली नाही. किंवा त्याला असंही वाटलं असावं हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्याला सोडून जाल’.

तज्ज्ञ पुढे असंही म्हणतात की, ‘या रिस्कसोबत पुढे जायचं की, हे नातं संपुष्टात आणायचं हा सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तथापि, तुमच्या प्रियकराने हा पर्याय संबंध प्रस्थापित करण्याआधी द्यायला हवा होता, नंतर नाही. हे पूर्णत: चुकीचं आहे. जर तुम्हाला या आजाराविषयी जाणून घ्यायचं असेल एखाद्या डॉक्टरचीही मदत घेऊ शकता. नातं टिकवून ठेवायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.’

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker