7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात मोठी बातमी! जिल्हाअंतर्गत बदलीबाबत सुधारित शासन परिपत्रक जारी

7th Pay Commission : राज्य शासन (State Government) सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रानो राज्य शासनात जिल्हा परिषदमधील शिक्षक (Zila Parishad Shikshk) संवर्गाच्या बदली संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट हाती आल आहे. यां कर्मचाऱ्यांच्या 2022 मधील बदली संदर्भात एक महत्त्वाचा शासन परिपत्रक निर्गमित झाल आहे.

सदर शासन परिपत्रक राज्य शासन सेवेत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद मधील शिक्षक (ZP Teacher) संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात महत्त्वाच आहे. सदर शासन परिपत्रक (Government Letter) ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 12 ऑक्टोबर 2022 रोजी जारी करण्यात आले आहे.

सदर शासन परिपत्रकात जिल्हा परिषद मधील शिक्षक संवर्गाच्या शिक्षक संवर्गाच्या जिल्हाअंतर्गत बदलीबाबत महत्त्वाच्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आज आपण ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल हे महत्त्वाचं शासन परिपत्रक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ग्रामविकास विभागाने जारी केलेल बदलीसंदर्भात महत्त्वाचा शासन परिपत्रक पुढील प्रमाणे

मित्रांनो दि.०७.०४.२०२१ मध्ये जिल्हा अंतर्गत बदली बाबत एक सुधारित शासन निर्णय जारी झाला होता. या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आता शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.

सदर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना 2021 मध्ये जारी झालेल्या शासन निर्णयातील विवरणपत्र 1 मधील बदलीस पात्र शिक्षकप्रमाणे अ) (मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास, बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) किंवा आ) (मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) दोन पर्यायापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा असून अशा शिक्षकांनी कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र राहतील, अशी तरतूद देखील यामध्ये आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत दि. ०७/१०/२०२२ रोजी जिल्हा परिषद शिक्षक बदली अभ्यास गटासमवेत व्हीसीद्वारे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयाचे विवरण पत्र- १ ‘बदलीस पात्र शिक्षक’ याबाबत खालीलप्रमाणे अधिकचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे :

जर एखाद्या शिक्षकांने सदर विवरण पत्र १ मध्ये नमूद केलेला उक्त अ) येथील पर्याय निवडल्यास, अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बाबीमुळे होत असलेल्या बदलीवेळी उपलब्ध असलेल्या रिक्त जागी, अशा शिक्षकांची बदली होईल. सदर बदली पूर्णतः प्रशासकीय असल्याने अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळेलच असे नाही. मात्र, जर एखाद्या शिक्षकाने सदर विवरण पत्र १ मध्ये नमूद केलेला उक्त आ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळू शकणार आहे.