7th Pay Commission : मित्रांनो राज्य शासन (State Government) सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) आजची ही बातमी विशेष महत्त्वाची आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे राज्य कर्मचाऱ्यांना (Government Employee) वेगवेगळ्या रजा लागू केल्या जातात.
राज्य कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या नैमित्तिक रजा (Government Employee Leaves) राज्य शासनाकडून लागू होत असतात. राज्य कर्मचाऱ्यांना सदर रजा कायद्याच्या अधीन राहून दिल्या जातात. यासाठी राज्य कर्मचाऱ्यांना रजा नियम 1981 लागू आहे.
या कायद्याचे पालन करून राज्य कर्मचाऱ्यांना रजा ह्या मंजूर केल्या जातात. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या रजेसंदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या कायद्यात राज्य कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने रजा अनुज्ञय केली जाते?
याविषयी सविस्तर माहिती आणि नियमावली देण्यात आली आहे. आज आपण देखील राज्य कर्मचाऱ्यांना कोणत्या कारणांसाठी किती दिवसाची नैमित्तिक रजा मिळत असते याविषयी थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
विशेष नैमितिक रजा (Special Casual Leave)
- पिसाळलेला कुत्रा अथवा तत्सम जनावराने चावा घेतल्यास :- पिसाळलेला कुत्रा अथवा तत्सम जनावर आणि चावा घेतल्यास राज्य कर्मचाऱ्यास 21 दिवस विशेष नैमितिक रजा मिळू शकते असं प्रावधान आहे मात्र यासाठी वैद्यकीय दाखला आवश्यक असतो.
- स्वतः नसबंदी केल्यास :- कर्मचाऱ्यांनी स्वतःलाच बंदी केल्यास त्याला सहा दिवसांची नैमित्तिक रजा मिळू शकते. मात्र यासाठी देखील वैद्यकीय दाखला आवश्यक असतो याची नोंद राज्य कर्मचाऱ्यांना घ्यावी.
- कर्मचाऱ्यांच्या पत्नीने बाळत पणा नंतर लगेचच संततिनियमन शस्त्रक्रिया केल्यास :- मित्रांनो विशेष नैमितिक रजेमध्ये कर्मचाऱ्यांच्या पत्नीने बाळंतपणानंतर लगेच संततिनियमन शस्त्रक्रिया केल्यास नैमितिक रजा मिळण्याचे प्रावधान आहे. असा प्रसंग उद्भवल्यास राज्य कर्मचाऱ्यांना 4 दिवस नैमित्तिक रजा मिळत असते मात्र यासाठी वैद्यकीय दाखला आवश्यक असतो.
- राज्य कर्मचाऱ्यांच्या पत्नीने बाळातपणा व्यतिरिक्त अन्य वेळी संततिनियमन शस्त्रक्रिया केल्यास :- राज्य कर्मचाऱ्यांच्या पत्नीने बाळातपणा व्यतिरिक्त अन्य वेळी संततिनियमन शस्त्रक्रिया केल्यास नैमित्तिक रजा मिळण्याचे प्रावधान आहे. याप्रसंगी राज्य कर्मचाऱ्यांना सात दिवसाची नैमित्तिक रजा मिळत असते यासाठी वैद्यकीय दाखला आवश्यक असतो.
- स्त्री कर्मचाऱ्याने बाळातपणा व्यतिरिक्त अन्य वेळी संततिनियमन शस्त्रक्रिया केल्यास :- अशा प्रसंगी स्त्रीकर्मचाऱ्याला चौदा दिवस नैमितिक रजा देण्याचे प्रावधान आहे यासाठी सहाजिकच वैद्यकीय दाखला मागितला जातो.
- कर्मचाऱ्याने विनामूल्य आणि स्वेच्छेने रक्तदान केल्यास :- राज्य कर्मचाऱ्यांना विनामूल्य आणि स्वच्छेने रक्त दान केल्यास अशा राज्य कर्मचाऱ्यांना एक दिवसाची नैमित्तिक रजा मिळण्याचे प्रावधान आहे. यासाठी देखील वैद्यकीय दाखला मागितला जातो.
- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी :- राज्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी एका कॅलेंडर वर्षात जवळपास तीस दिवस नैमित्तिक रजा देण्याचे प्रावधान आहे. मित्रांनो यासाठी क्रीडा अधिकाऱ्याचा दाखला आवश्यक असतो याची काळजी देखील कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे.
- कर्मचान्याच्या पत्नीने बाळंतपणानंतर किंवा अन्य वेळी केलेली नसबंदी शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे दुसऱ्यांदा नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास :- मित्रांनो असा प्रसंग उद्भवल्यास कर्मचाऱ्यास सात दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मिळत असते यासाठी वैद्यकीय दाखला मात्र आवश्यक असतो.
नैमितिक/ किरकोळ रजा (Casual Leave) (अचानक, आपत्कालीन खाजगी कामासाठी रजा) किरकोळ रजा. अत्यंत निकड असतांना काढली जाते
1 जानेवारी ते 31 डिसेंबर या एका कॅलेंडर वर्षात आठ दिवस रजा घेतली जाऊ शकते. एकावेळी तीन दिवसांपेक्षा जास्त रजा घेतली जात नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये दहा दिवसापर्यंत रजा वाढवता येते. किरकोळ रजा शक्यतोवर बिन पगारी करू नये. किरकोळ रजा नामंजूर करणे रद्द करणे अशी तरतूद कायद्यात नसल्यामुळे प्रसंगी कर्मचाऱ्याने असेल तरी केला नाही तरीदेखील अशी रजा रद्द करता येत नाही.
किरकोळ रजा हि रजा समजली जात नाही. कोणत्याच अन्य प्रकारच्या रजेला जोडून किरकोळ रजा घेता येत नाही. तसेच किरकोळ रजेला जोडून या वर नमूद केलेल्या अन्य रजा घेता येत नाहीत. सार्वजनिक सुट्टी ला जोडून मात्र किरकोळ रजा घेता येते. याची सेवा पुस्तकात देखील नोंद घेता येत नाही यासाठी एक स्वतंत्र नोंदवही असते.