7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची होणार चांदी….! दिवाळीच्या दिवशी वाढणार 6% महागाई भत्ता ; आज होणार अंतिम निर्णय

7th Pay Commission : मित्रांनो आजपासून संपूर्ण भारतवर्षात दिवाळीच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार समवेतच वेगवेगळ्या राज्यातील राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला आहे.

मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे केंद्र सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employee) महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र शासनाकडून केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) करण्यात आली होती. जुलै महिन्यापासून सदर महागाई भत्ता वाढ करण्यात आली होती आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यापासून रोखीने याचा लाभ मिळणार होता. जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू असल्याने जुलै ते सप्टेंबर या महिन्यातील महागाई भत्ता थकबाकी देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा खात्यात वर्ग करण्यात आली आहे.

म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मित्रांनो केंद्र सरकारच्या घोषणेनंतर बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह अनेक राज्य सरकारांनी महागाई भत्ता वाढीची घोषणा देखील केली आहे. शिवाय आपल्या महाराष्ट्रात देखील राज्य कर्मचारी (State Government Employee) महागाई भत्ता वाढ दिवाळीपूर्वी दिली जावी अशी मागणी सरकारकडे (Government) करत आहेत.

डीए वाढीवर आज शिक्कामोर्तब होणार 

दरम्यान आता पंजाब राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या पहिल्या दिवशी, वसुबारसाला म्हणजे आज पंजाबचे भगवंत मान सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात करणार आहे. इतर राज्य सरकारांप्रमाणे पंजाब सरकारही कर्मचाऱ्यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा करेल, असे मानले जात आहे.

पण ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पंजाब सरकार या वेळी पंजाब राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ता वाढ लाभ देणार आहे. दरम्यान या रिपोर्टमध्ये शुक्रवारी होणाऱ्या पंजाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वित्त विभागाने मुख्यमंत्र्यांना 6 टक्के डीए मंजूर करण्याची फाइल पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर डीए वाढीचा मुद्दा मंत्रिमंडळात चर्चिला जाणार आहे.

यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कर्मचार्यांच्या 6% डीए वाढीचा विचार केला जाऊ शकतो. याच्यावर अजून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र जर पंजाब सरकारने सहा टक्के महागाई भत्ता वाढ दिली तर महाराष्ट्रात देखील राज्य कर्मचारी महागाई भत्ता वाढीबाबत आक्रमक होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. 

ऑक्टोबरच्या वेतनातं मिळणार महागाई भत्ता वाढीचा लाभ

यापूर्वी हरियाणा सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. हरियाणामध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 1 जुलै 2022 पासून 38 टक्के महागाई भत्ता लागू होईल.  कर्मचाऱ्यांना वाढलेला डीए ऑक्टोबरच्या पगारात दिला जाईल. याशिवाय जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा पेमेंट सोबत सदर महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

डीए वर्षातून दोनदा वाढतो

केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा डीए वाढवण्याची घोषणा केली जाते. सध्या विविध राज्य सरकारांकडून जुलैमध्ये वाढवण्यात येणारा डीए जाहीर केला जात आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील राज्य कर्मचारी देखील महागाई भत्ता वाढीसाठी प्रतीक्षेत आहेत. राज्य कर्मचाऱ्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढ दिली जावी याबाबत मागणी सरकारकडे केली जात आहे.