7th Pay Commission : ब्रेकिंग ; राज्य शासन सेवेत कार्यरत असलेल्या ‘या’ कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू, 18 ऑक्टोबर रोजी शासन निर्णय झाला निर्गमित

7th Pay Commission : मित्रांनो प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी (Government Employee) एक महत्वाची बातमी समोर येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) ही एक निश्चितच आनंदाची बातमी राहणार आहे.

मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै 2022 पासून चार टक्के दराने महागाई भत्ता वाढ दिली आहे. म्हणजे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना (central government employee) 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.

आता केंद्र शासनाच्या याच धर्तीवर राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू केला जात आहे. सदर महागाई भत्ता महागाई भत्ता थकबाकीसह लागू होणार आहे. म्हणजेच जुलै महिन्यापासून ते आत्तापर्यंत सदर कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढ थकबाकी देखील लागू होणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून 18 ऑक्टोबर रोजी एक महत्वाचा शासन निर्णय (Government resolution) निर्गमित झाला आहे.

मित्रांनो सदर महागाई भत्ता वाढ महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागु होणार आहे. या शासन निर्णयान्वये सदर कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढ देऊ केली जाणार आहे. म्हणजेच आता या कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील कर्मचारी वर्गाला चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

निश्चितच येत्या काही दिवसात दिवाळीचा सण येतोय अशा परिस्थितीत सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. महागाई भत्ता वाढ लागू झाली असल्याने सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनात भली मोठी वाढ पाहायला मिळणार आहे.

त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांकडून सामान्य प्रशासन विभागाचे कौतुक केले जात आहे. सामान्य प्रशासन विभागाने 18 ऑक्टोबर रोजी जारी केलेला शासन निर्णय आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

सामान्य प्रशासन विभागाचा जारी झालेला शासन निर्णय खालील प्रमाणे :- 

सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणेकेंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक ०३.१०.२०२२ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१.०७.२०२२ पासून लागू करण्यात आलेला ४ % वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.०१.०७.२०२२ पासून ३८ % दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.