7th Pay Commission : येत्या काही दिवसात संपूर्ण भारत वर्षात दिवाळी सणाला (Diwali Festival) प्रारंभ होणार आहे. अशा परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांकडून (State Government Employee) दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांना (Government Employee) ऑक्टोबर महिन्याच पेमेंट दिवाळीआधीच दिले जावे अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान आता याबाबत एक महत्त्वाच परिपत्रक निर्गमित झाला आहे. मित्रांनो हे परिपत्रक राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांसाठी विशेष महत्त्वाचे राहणार आहे.
मित्रांनो राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिवाळी सणा पूर्वी ऑक्टोबर महिन्यातील वेतन (October Payment) दिले जावे या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांनी 11 ऑक्टोबर 2022 रोजी एक महत्त्वाचं शासन परिपत्रक जारी केला आहे. अशा परिस्थितीत आज आपण या शासन (Government) परिपत्रकात नेमकं काय दडलं आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो खरे पाहता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोकण विभाग यांच्याकडून गेल्या काही दिवसांपूर्वी एक निवेदन संबंधित विभागाला सादर केले गेले होते. सदर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोकण विभाग यांच्याकडून देण्यात आलेले निवेदन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय यांना प्राप्त झाल्यानंतर सदर कार्यालयाकडून या निवेदनाला अनुसरून हे महत्त्वाचं शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
या परिपत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, परिपत्रकाचा विषय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यातील पेमेंट दिवाळी सणाआधी म्हणजे 24 ऑक्टोबर 2022 आधी मिळणेबाबत असा आहे. तसेच या परिपत्रकात असं म्हटलं आहे की, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोकण विभाग यांच्याकडून दिवाळी सणाआधी म्हणजे 24 ऑक्टोंबर 2022 आधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यातील वेतन दिले जावे याबाबत निवेदन आले आहे.
तसेच पत्रकात पुढे म्हटले आहे की, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना ऑक्टोबर महिन्याचे पेमेंट 24 ऑक्टोबर 2022 पूर्वी अदा करणे हेतू आवश्यक ती सर्व उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयात सादर करावा. या अहवालाची प्रत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोकण विभाग यांना देखील देण्यात आली आहे.
यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच ऑक्टोबर महिन्याचे पेमेंट मिळणार असल्याचे जाणकार नमूद करत आहे. निश्चितच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाआधी हे एक मोठ गिफ्ट राहणार आहे.