7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी शिंदे सरकारची खास भेट.! घेतला हा कर्मचारी हिताचा निर्णय

7th Pay Commission : राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्य शासनाने (State Government) एक कर्मचारी हिताचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सदर निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना (Government Employee) मोठा दिलासा मिळणार आहे.

मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे की, येत्या काही दिवसात महाराष्ट्रसमवेतच संपूर्ण भारतात दिवाळीची (Diwali) धूम रंगणार आहे. अशा परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सणात पैशांची चणचण भासू नये यासाठी नवोदित शिंदे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी तसेच ईद सणानिमित्त सण अग्रीम रक्कम देण्यात येते. म्हणजेच या रकमेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सणांचा मनमुराद आनंद घेता येतो. दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारासोबत अनमोल वेळ खर्ची करता यावा तसेच या कालावधीत पैशांची कमतरता भासू नये या अनुषंगाने ही सण अग्रीम रक्कम (Diwali Bonus) दिली जाते.

शिवाय आता दिवसेंदिवस महागाई वाढत आहे अशा परिस्थितीत सन अग्रिम रकमेची जवळपास सर्वच राज्य कर्मचाऱ्यांना नितांत आवश्यकता असते. सोनू यावर्षी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांना सण अग्रीम रक्कम दिली जाणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की राज्य कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रुपये सण अग्रीम रक्कम भेटणार आहे. यासाठी नवोदीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरीदेखील दिली आहे.

विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना देऊ केली जाणारी ही रक्कम बिनव्याजी असते. त्यामुळे निश्चितच या रकमेचा कर्मचाऱ्यांना फायदा होतो. कर्मचाऱ्यांना देऊ केली जाणारी ही अग्रीम रक्कम कर्मचाऱ्यांच्या पुढील दहा महिन्याच्या पेमेंट मधून टप्प्याटप्प्याने वजा केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रक्कमेची फेड वन टाइम करावी लागत नसल्याने याचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होतो.

यावर्षी कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रुपये सन अग्रीम रक्कम जारी करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून देण्यात आली आहे.