MHLive24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- सध्या हिवाळा सुरु आहे. आणि याच हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे भाव वाढले आहेत. असे असतानाही, महाराष्ट्रातील सोलापूरमधील एका शेतकऱ्याने 1,123 किलो कांदा विकून केवळ 13 रुपये कमवले आहेत. ऐकून धक्का बसला ना? महाराष्ट्रातील एका शेतकरी नेत्याने हे अस्वीकार्य म्हटले आहे.(Important News)

तर एका कमिशन एजंटने मालाची कमी किंमत निकृष्ट दर्जामुळे मिळाल्याचा दावा केला आहे.
सोलापूर येथील कमिशन एजंटने दिलेल्या विक्री पावतीत, बाप्पू कवडे या महाराष्ट्रातील शेतकऱ्याने 1,123 किलो कांदा बाजारात पाठवला आणि त्या बदल्यात त्याला फक्त 1,665.50 रुपये मिळाले असे दिसून येत आहे.

यामध्ये मजुरीचा खर्च, वजनाचे शुल्क आणि शेतातून कमिशन एजंटच्या दुकानात माल नेण्यासाठी वाहतूक खर्च 1,651.98 रुपये आला. तो यातून वजा केल्यास खाली 13 रुपये कमावले आहेत.

कवड़े यांच्या विक्रीची पावती ट्विट करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी लोकसभा खासदार राजू शेट्टी म्हणाले, “या 13 रुपयांचे कोणी काय करेल. हे मान्य नाही. शेतकऱ्याने आपल्या शेतातून 24 पोती कांदे कमिशन एजंटच्या दुकानात पाठवले आणि त्याबदल्यात त्याला केवळ 13 रुपये मिळाले.”

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup