Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.

जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. अशातच प्लास्टिक उत्पादने बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे.

ही कंपनी एस्ट्रल लिमिटेड आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीचे शेअर्स 2 रुपयांवरून 1700 रुपयांपर्यंत वाढले आहेत. Astral Ltd च्या शेअर्सनी या कालावधीत 70,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,524.95 रुपये आहे. त्याच वेळी, एस्ट्रल लिमिटेडच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक रु. 1,609.75 आहे.

1 लाख रुपये झाले 8.8 कोटी रुपये :- एस्ट्रल लिमिटेडचे ​​शेअर्स 13 मार्च 2009 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 1.98 रुपयांच्या पातळीवर होते. 3 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स NSE वर 1746 रुपयांवर बंद झाले.

या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी 70,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 13 मार्च 2009 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली

असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 8.81 कोटी रुपये झाले असते. 8 जून 2012 रोजी Astral Limited चे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 25.33 रुपयांच्या पातळीवर होते.

3 जून रोजी कंपनीचे शेअर 1746 रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती,

तर सध्या हे पैसे 69 लाख रुपयांच्या जवळपास गेले असते. Astral Limited च्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षात 350 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याचवेळी, या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सनी 25 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.