Share Market Update
Share Market Update

Share Market : काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये आर्थिक पडझड सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्या मधील सुरू असलेले युद्ध! रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे.

दरम्यान युद्धाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्यामुळे गुंतवणुकदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अशातच बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.

ही कंपनी बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन आहे. कंपनी कॉंक्रीट ब्लॉक्स आणि विटा बनवते. बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनच्या समभागांनी गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना 2,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी 5 ते 125 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनचे शेअर्स 126 रुपयांवर बंद झाले.

बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनचे शेअर्स 22 मे 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 4.84 रुपयांच्या पातळीवर होते. 12 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 126 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत 2,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 22 मे 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 26.03 लाख रुपये झाले असते. म्हणजेच 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदाराला 25 लाख रुपयांचा नफा झाला असेल.

एका वर्षात 650 टक्क्यांहून अधिक परतावा :- बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या समभागांनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 655 टक्के परतावा दिला आहे. 13 एप्रिल 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये कंपनीचे शेअर्स 16.61 रुपयांच्या पातळीवर होते.

12 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 126 रुपयांवर बंद झाले. एखाद्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 7.58 लाख रुपये झाले असते.

बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनच्या शेअर्सनी या वर्षी आतापर्यंत 102% परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 358 टक्के परतावा दिला आहे.

कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 15.44 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची उच्च पातळी 130.90 रुपये आहे