MHLive24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- शेअर बाजार यावेळी शानदार कामगिरी करत आहे आणि यासह शेअर बाजाराने 62,000 चा आकडा पार केला आहे. दरम्यान, असे अनेक शेअर आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. मागच्या आठवड्यात बाजारात चांगली तेजी राहिली. ही तेजी सलग दुसऱ्या आठवड्यातही दिसून आली.(One lakh became 12 lakh)

मागच्या आठवड्यात शेअर बाजाराने नवा विक्रम नोंदवला. असे काही स्टॉक आहेत की ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत बक्कळ कमाई करुन दिली आहे. बोरोसिल रिन्युएबल्स शेअर देखील त्यातीलच आहे. भारतात सोलार ग्लास बनविणारी एकमेव कंपनी बोरोसिल रिन्यूएबल्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे.

बोरोसिल रिन्यूएबल्सच्या शेअर्सने गेल्या 1 महिन्यात 45 टक्के रिटर्न्स दिले आहेत. इक्विटीमास्टर, वरिष्ठ रिसर्च अ‌ॅनालिसिस्ट ऋचा अग्रवाल यांनी द इकोनॉमिक टाईम्सला सांगितलं की, देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सौर ऊर्जा व्यवसायासाठी अलीकडेच अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या विकत घेतल्या आहेत. यामुळे, ग्रीन एनर्जी थीमला आता गती मिळत आहे. येत्या काळातही या कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहतील अशी अपेक्षा आहे.

गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स

एप्रिल 2020 मध्ये, बोरोसिल रिन्यूएबल्सचे शेअर्स 33.6 रुपयांच्या रेंजवरून 1400 टक्क्यांनी वाढून 509.70 रुपयांपर्यंत पोहोचले होते. गेल्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये मात्र, बोरोसिलच्या शेअर्सने लोअर सर्किट गाठली आहे. त्याच्या किमती आता त्यांच्या पीकपासून 10 टक्के कमी झाल्या आहेत.

बोरोसिल रिन्युएबल्समध्ये गुंतवणूक कधी करावी?

बोरोसिल रिन्युएबल्सचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडमध्ये 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर पोहोचले आणि त्याचे शेअर 446.80 वर आहेत. बोरोसिलच्या शेअर्सने गेल्या 1 वर्षात 333 टक्के रिटर्न दिला आहे. इक्विटी 99 चे सह-संस्थापक राहुल शर्मा म्हणाले की, बोरोसिलने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 200 कोटी उभारले आहेत.

कंपनीला आपली सोलार ग्लास उत्पादन क्षमता 450 टन प्रतिदिन वरून 955 टन प्रतिदिन करायची आहे. त्यामुळे बोरोसिलचे शेअर्स वाढण्याची अपेक्षा आहे. परंतु सध्याच्या लेव्हलवर शेअर खरेदी करण्याची शिफारस करत नसल्याचे शर्मा म्हणाले.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup