Multibagger Stock
Multibagger Stock

Multibagger Stock: मल्टीबॅगर स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात.

आज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत. दरम्यान एका पेनी स्टॉकने लोकांना एका वर्षात श्रीमंत केले आहे. या समभागाने एका वर्षात उत्कृष्ट परतावा दिला आहे.

हा शेअर सेजल ग्लासचा आहे. सेजल ग्लासच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात 7,500 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या 1 वर्षात कंपनीचे शेअर्स 3 रुपयांवरून 240 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 517 रुपये आहे.

एका वर्षात 75 लाख 
सेजल ग्लासचे शेअर 30 एप्रिल 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 3.20 रुपयांच्या पातळीवर होते. 12 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 240 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत.
सेजल ग्लासच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 7500 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 30 एप्रिल 2021 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 75 लाख रुपये झाले असते.
सेजल ग्लासच्या शेअर्सने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 1658 टक्के परतावा दिला आहे. 13 डिसेंबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 13.65 रुपयांच्या पातळीवर होते.
कंपनीचे शेअर्स 12 मे 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 240 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 13 डिसेंबर 2021 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या हे पैसे 17.58 लाख रुपयांच्या जवळपास गेले असते. सेजल ग्लासच्या शेअर्सने यावर्षी आतापर्यंत 883 टक्के परतावा दिला आहे.