Best Mutual Fund 2022 : ‘ह्या’ आहेत पैसे डबल करणाऱ्या जबरदस्त स्कीम !

 सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा एसआयपी हा आता भारतातील नवीन पिढीमध्ये एक अतिशय लोकप्रिय गुंतवणूक पर्याय बनला आहे. किंबहुना, आता देशांतर्गत गुंतवणूकदार हे इक्विटी मार्केटचे प्रमुख प्रेरणास्थान आहेत.

लोक अनेक इक्विटी योजनांमध्ये पैसे गुंतवतात जे शेअर बाजाराशी रिलेटेड असतात. पण चांगला परतावा देणारी सर्वोत्तम एसआयपी कशी निवडावी हा गुंतवणुकदारांच्या मनामध्ये पडणारा एक सामान्य प्रश्न आहे.

सर्वोत्तम योजना कशी निवडावी
सर्वोत्तम योजना निवडण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही रिसर्च फर्मचे रेटिंग किंवा मागील वर्षांच्या परताव्यावर आधारित योजना निवडू शकता किंवा म्युच्युअल फंड ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांचे विश्लेषण करू शकता.

Advertisement

आणखी एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्यांची अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AUM). आम्ही तुम्हाला याठिकाणी 3 सर्वोत्कृष्ट SIP म्युच्युअल फंडांची लिस्ट याठिकाणी देणार आहोत. ज्यांनी गेल्या एका वर्षात प्रचंड परतावा दिला आहे आणि रेटिंग एजन्सी CRISIL कडून 5 स्टार रेटिंग देखील मिळवले आहे.

क्वांट टॅक्स प्लॅन
क्वांट टॅक्स प्लॅन  हा एक डायरेक्ट प्लान आहे, जो  ELSS श्रेणी अंतर्गत येतो. याचा अर्थ हा फंड तुम्हाला कर वाचवण्यास मदत करेल, परंतु त्याचा लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा असेल. मागील 1 वर्षात फंडाने 27.18% परतावा दिला आहे, मागील 2 वर्षातील फंडाने 86.85% परतावा दिला आहे, मागील 3 वर्षात फंडाने 110.92% परतावा दिला आहे तर 5 वर्षांचा परतावा 135.81% आहे.

कोटक स्मॉल कॅप फंड
कोटक स्मॉल कॅप फंड  हा देखील एक डायरेक्ट प्लान आहे. हा स्मॉल कॅप फंड आहे. मागील 1 वर्षात फंडाने 29.95% परतावा दिला आहे, मागील 2 वर्षात या फंडाने 88.73% परतावा दिला आहे, मागील 3 वर्षात फंडाने 110.30% परतावा दिला आहे, तर 5 वर्षांचा परतावा 123.23% आहे. कोटक स्मॉल कॅप फंड आणि क्वांट टॅक्स प्लॅनने गेल्या 3 वर्षांपासून समान परतावा दिला आहे. मात्र क्वांट टॅक्स प्लॅनमध्ये केवळ 5 वर्षांचे रिटर्न चांगले आहेत.

Advertisement

क्वांट स्मॉल कॅप
क्वांट स्मॉल कॅप एक डायरेक्ट प्लान आहे आणि स्मॉल-कॅप श्रेणी अंतर्गत देखील येते. मागील 1 वर्षात फंडाने 35.28% परतावा दिला आहे, मागील 2 वर्षात फंडाने 123.88% परतावा दिला आहे, मागील 3 वर्षात फंडाने 150.59% परतावा दिला आहे तर 5 वर्षाचा परतावा 158.85% आहे. कोटक स्मॉल कॅप फंड आणि क्वांट स्मॉल कॅप हे स्मॉल कॅप फंड आहेत ज्यांची जोखीम जास्त असते. केवळ तेच गुंतवणूकदार या फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात जे धोका पत्करण्यास तयार आहेत.

क्वांट स्मॉल कॅपचे AUM
Quant Small Cap ची AUM रु. 1270.6 कोटी आहे, तर एक्सपेंस रेशियो 0.5% आहे, ज्यामुळे तो एक आकर्षक फंड बनतो. या फंडाच्या टॉप 5 होल्डिंग्समध्ये ITC लिमिटेड, इंडियाबुल्स रिअल इस्टेट लिमिटेड, अरविंद लिमिटेड, बँक ऑफ इंडिया आणि इंडिया सिमेंट्स लिमिटेड यांचा समावेश आहे. हा फंड 11.02% लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करतो. मिड कॅपमध्ये त्याची 7.67% गुंतवणूक आहे आणि स्मॉल कॅपमध्ये त्याची कमाल गुंतवणूक 68.9% आहे.

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker