MHLive24 टीम, 24 जानेवारी 2022 :- सध्या कोरोनाकाळात बहुतेक सर्वानाच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. यामुळे अनेकजण हवालदिल झाले तर अनेकांनीयातून नविन मार्ग काढला. यात अनेकांनी स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचे ठरवले.(Government Schemes)

पण काहीना व्यवसायासाठी आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागला. आज आम्ही तुम्हाला याच आर्थिक विवंचनेचा सामना करण्यासाठी काही सरकारी योजनांची माहिती देणार आहोत.

पंतप्रधान मुद्रा योजनेतून तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता

एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्याचे जुने काम वाढवण्यासाठी सरकारने 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत, प्रत्येक व्यक्ती कर्ज घेऊ शकते, ज्यांच्या नावावर कुटीर उद्योग आहे किंवा ज्यांच्याकडे भागीदारीची कागदपत्रे आहेत.

लहान असेंबलिंग युनिट्स, सेवा क्षेत्रातील युनिट्स, दुकानदार, फळ/भाजी विक्रेते, ट्रक ऑपरेटर, फूड-सर्व्हिस युनिट्स, रिपेअर शॉप्स, मशीन ऑपरेशन्स, लघु उद्योग, कारागीर, फूड प्रोसेसिंग युनिट्स सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत कर्ज घेतले जाऊ शकते.

कर्ज योजना तीन भागात विभागली आहे

शिशु कर्ज योजना :- या योजनेंतर्गत दुकान वगैरे उघडण्यासाठी 50000 रुपयांपर्यंत कर्ज घेता येते.
किशोर कर्ज योजना- या योजनेतील कर्जाची रक्कम 50,000 ते 5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

तरुण कर्ज योजना :- जर तुम्हाला लघुउद्योग सुरू करायचा असेल तर तरुण कर्ज योजनेअंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांचे कर्ज घेता येते.

कर्ज कसे मिळवायचे ते जाणून घ्या

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही सरकारी बँक, ग्रामीण बँक, सहकारी बँक, खाजगी बँक किंवा परदेशी बँकांकडून कर्ज घेता येते.

RBI ने 27 सरकारी बँका, 17 खाजगी बँका, 31 ग्रामीण बँका, 4 सहकारी बँका, 36 सूक्ष्म वित्त संस्था आणि 25 बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना मुद्रा कर्ज वाटप करण्यासाठी अधिकृत केले आहे. प्रधान मंत्री मुद्रा योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, mudra.org.in या अधिकृत वेबसाइटवर संपूर्ण तपशील उपलब्ध आहेत.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup