Surat-Chennai Greenfield Highway : अहमदनगर (Ahmednagar) व सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmer) तसेच सामान्य जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा तसेच मराठवाड्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील तीन प्रमुख जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या विकासाला पंख देणारा सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेबाबत एक महत्त्वाचं अपडेट हाती आल आहे.

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे विषयी थोडक्यात…!

हा महामार्ग 1271 किलोमीटर लांबीचा आणि सहापदरी असून 70 मीटर रुंदी या महामार्गाची राहणार आहे मात्र असे असले तरी या महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना शासनाकडून 100 मीटर रुंदीची जमीन संपादित केली जाणार आहे. 1271 किलोमीटर लांब असलेला हा महामार्ग एकूण दोन विभागात विभागलेला आहे. हा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे सुरत ते सोलापूर 564 किलोमीटर आणि सोलापूर ते चेन्नई 707 किलोमीटर लांबीचा राहणार असून सदर महामार्ग हा सहा पदरी आहे.

हा महामार्ग 2025 पर्यंत तयार करून सामान्य जनतेसाठी सुरू करण्याचा मायबाप सरकारच्या मानस आहे. विशेष म्हणजे या महामार्गातील सुरत – नाशिक – अहमदनगर या 290.70 किलोमीटर च्या पहिल्या टप्प्यासाठी DPR देखील तयार करण्यात आला आहे. यामुळे निश्चितच हा महामार्ग 2025 पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला होणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हा सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग मराठवाड्यातील (Marathwada) बीड, उस्मानाबाद तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर नाशिक (Nashik) या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाचा तर आहेच मात्र या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या शेती व उद्योगधंद्याला गती मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाला देखील पंख जोडले जाणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील 6 तालुक्यातुन जाणार हा महामार्ग…!

मित्रांनो, सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे नाशिक मधून येऊन अहमदनगर मध्ये 98.5 किलोमीटर अंतर कापणार आहे. म्हणजेच नगर जिल्ह्यासाठी देखील हा महामार्ग अतिशय महत्वाचा ठरणार आहे. हा सहा पदरी महामार्ग संगमनेर, राहाता, राहुरी, नगर, कर्जत व जामखेड या 6 तालुक्यातून जाणार आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 49 गावातील अंदाजे 1500 हेक्टर जमिनीचे संपादन होणार असल्याची माहिती सांगितली गेली आहे. तसेच वांबोरी घाटात 30 ते 40 मीटर उंचीचे खांब उभारून हा महामार्ग तयार केला जाणार आहे.

मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, हा राष्ट्रीय महामार्ग मराठवाड्यातील बीड उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर आणि नाशिक या पाच जिल्ह्यातून जाणार आहे. या सहापदरी महामार्गात या पाच जिल्ह्यातील कोणकोणत्या गावांचा समावेश आहे तसेच सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या जमिनी या महामार्गासाठी संपादित केल्या जाणार आहेत याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेकडून या महामार्ग बाबत एक महत्त्वाचं नोटिफिकेशन सार्वजनिक करण्यात आल आहे. 10 व 17 ऑगस्ट 2022 रोजी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेने सोलापूर 3D तर बीड – अहमद नगर 3A चे  राजपत्रक प्रकाशित केलं आहे. सदर नोटिफिकेशनमध्ये  अहमदनगर आणि मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गावे तसेच सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि बार्शी तालुक्यामधील काही गावांचा यामध्ये समावेश करून राजपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे.

या प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्रकात अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनीचा सर्वे नंबर, जमिनीचा प्रकार, अधिग्रहित क्षेत्र, जमीन मालकांची नावे अशा प्रकारची सर्व माहिती सविस्तर देण्यात आली आहे. यामुळे प्रकाशित झालेल सदर राजपत्रक 55 पानांचं लांबलचक आहे.

अमदनगर जिल्ह्यातील अधिग्रहित केली जाणारी गावांची नावे…!

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरपासून थेट चिंचोली गुरव, तळेगाव, वडझरी, कासारे, लोहारे, गोगलगाव, सदतपूर, हसनपूर, सोनगाव राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठमार्गे – खडांबे, वांबोरी  मांजरसुब्बा पुढे नगर शहराजवळील चांदबीबी महालाजवळून बरदरी, सोनेवाडी, पारेवाडी, पारगाव भातोडी, भातोडी पारगाव, चिंचोडी पाटील, आठवड मधून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील नांदुर, वाघळूज, बालेवाडी, कुंभेफळ, चिंचोली, शिरपूर, टाकळ अमिया, नायगाव चोऊभा, केळसांगवी, धिरडी, इमानगाव, चिखली, खानापूर, वाळुंज, पारगाव जोगेश्वरी, वाळुंज या गावातून पुढे जामखेड तालुक्यात प्रवेश करेल.

हा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे जामखेड तालुक्यातून पुढे डोणगाव, पाटोदा, अरणगाव, खामगाव, ददसलेवाडी,खांडवी, फक्राबाद, बावी, राजेवाडी,नान्नज,वंजारवाडी, पोटेवाडी, चोभेवाडी मार्गे हा महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात प्रवेश करणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील किती जमीन महामार्गासाठी अधिग्रहित केली जाईल बर…! 

मित्रांनो आलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील एकूण 13 गावातन हा महामार्ग जाणार असून यासाठी शासनाकडून 282 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. राहता तालुक्यातील देखील 5 गावातन हा महामार्ग जाणार असून राहता तालुक्यातील 94 हेक्टर जमीन शासनाकडून अधिग्रहित केली जाणार आहे. राहुरी तालुक्याच्या एकूण 19 गावांमधून हा महामार्ग जाणार असून तालुक्यातील एकूण 428 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.

नगर तालुक्याच्या 10 गावातन हा महामार्ग जाणार असून तालुक्यातून एकूण 256 हेक्टर जमीन संग्रहित केली जाणार आहे. याशिवाय जामखेड तालुक्यातील एकूण 13 गावांमध्ये हा महामार्ग जाणार असून यासाठी 302 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशी एकूण 1362 हेक्टर जमीन आणि इंटरचेंज साठी सुमारे 125 एकर जमीन आणि एक जमीन म्हणून सुमारे दहा एकर जमीन शासनाकडून अधिग्रहित केली जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 1498 हेक्टर जमीन अधिग्रहित होणारं आहे.

अहमदनगर जिल्ह्यासाठी अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनीसाठी किती मोबदला मिळणार..!

मित्रांनो आपल्या माहितीसाठी, अहमदनगर जिल्ह्याच्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी केंद्र सरकारने अंदाजे 1020 कोटींची तरतूद देखील केलेली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जमीन अधिग्रहित केल्या जाणाऱ्या  शेतकऱ्यांची नावे :-

मित्रांनो येथे आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की  अहमदनगर जिल्ह्यातील जमीदारांची नावे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लवकरच प्रकशित केली जाणार असून त्याबाबत अपडेट येत्या काही दिवसात मिळणार आहे.

अहमदनगर – बीड जिल्ह्यातील गावांची नावे पाहण्यासाठी राजपञक डाउनलोड करण्यासाठी :- Click Here

सोलापूर जिल्ह्यातील अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमीन मालकांची नावे पाहण्यासाठी/ राजपञक डाउनलोड करण्यासाठी click here

या संबंधातील नोटिफिकेशन तुम्ही egazette.nic.in या संकेतस्थळावर पाहू शकता.