State Government Employee: महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अर्थात एमएसआरटीसीच्या कर्मचाऱ्यांच्या (MSRTC Employee) पगारा संदर्भात एक महत्वाची अपडेट आता हाती आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या (State Government) गृह विभागाकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगारासंदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य गृह विभागाकडून (Maharashtra State Home Department) जारी करण्यात आलेल्या शासन निर्णय अर्थात जीआर अनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) कर्मचाऱ्यांचा जून महिन्याचा पगार देण्यासाठी आवश्यक निधी वितरित करण्यात आलेला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य गृह विभागाने एक शासन निर्णय जारी केला आहे तो शासन निर्णय सविस्तर खालील प्रमाणे.

शासन निर्णय सविस्तर जसाचं तसा :- 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे जून २०२२ च्या वेतनासाठी सन २०२२-२३ मध्ये शासनाने विविध सवलत मुल्यांपोटी गृह (परिवहन विभागाच्या २०४१००१८-३३. अर्थसहाय्य लेखाशिर्षाखाली सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या रू. १४५०.०० कोटीपैकी रू.७९०.०० कोटी शिल्लक तरतूदीमधून रू.१००.०० कोटी (अक्षरी रुपये शंभर कोटी फक्त) एवढी रक्कम रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर रू.१००.०० कोटी हा खर्च सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा आणि सदर खर्च “मागणी क्रमांक बी-३, लेखाशिर्ष २०४१, वाहनांवरील कर (००) ००१, संचालन व प्रशासन (०१) परिवहन आयुक्त (०१) (०१) आस्थापना परिवहन आयुक्त, (दत्तमत्त) (अनिवार्य) (२०४१ ००१८) ३३, अर्थसहाय्य” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

३. यासाठी परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी असलेले लेखाधिकारी यांनी सदर रक्कम आहरित करुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास अदा करावी.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र. २६२/२०२२ /व्यय-८, दि.२५.०७.२०२२ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२२०८०२१२२०३३७७२९ असा आहे.