Post office Scheme :आजघडीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोस्ट बँकेकडे पाहिले जाते. पोस्ट ऑफीसदेखील आपल्याला भरपूर योजना देऊ करते, ज्यामध्ये सुरक्षिततेसोबत मजबूत फायदादेखील दिला जातो.

आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका महत्वाच्या योजनेबद्दलजाणून घेणार आहोत. वास्तविक पोस्ट ऑफिसजवळ एकापेक्षा एक योजना उपलब्ध आहेत. त्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळू शकतो.

याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लानबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही दररोज केवळ 100 रुपये गुंतवून काही वर्षांत 14 लाख रुपये मिळवू शकता.

पोस्ट ऑफिस ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स विशेषत: ग्रामीण भागासाठी डिझाइन केलेले आहे. या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दररोज 95 रुपये जमा करावे लागतील.

यानंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर 14 लाख रुपये मिळतील. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात मनी बॅक सुविधा मिळते. याचा अर्थ तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.

ग्राम सुमंगल योजनेत, विमाधारकाला परिपक्वतेवर बोनस देखील मिळतो. एखादी व्यक्ती या योजनेत 15 वर्षे ते 20 वर्षे गुंतवणूक करू शकते. या योजनेच्या पॉलिसीधारकाचे वय 19 ते 45 वर्षे दरम्यान असावे.

भारतातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. अशाप्रकारे ही योजना तुम्हाला अनेक अर्थाने फायद्याची ठरेल.

विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना मध्ये जोखीम नसते म्हणून गुंतवणूकदारांचा कल आता याठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी वाढत आहे. जर तुम्ही या योजनेत नियमितपणे गुंतवणूक करत असाल तर मॅच्युरिटीवर तुमच्याकडे सुमारे 14 लाख रुपये जमा असतील.