Government Scheme : सरकार नागरिकाना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना आणत असते. या योजनाद्वारे सरकार सामान्य नागरीकांना विविध सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करते. या योजनांचा भरपूर प्रसार देखील झाला आहे.

जर तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्सुक असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत अशातच सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना PM स्ट्रीट व्हेंडर आत्मानिर्भर निधी (PM SVANidhi) ची मुदत आता डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख मार्च 2022 पर्यंत होती.

वास्तविक या योजनेमुळे अनेकांना फायदा झाला आहे, तसेच अनेक लोक आता मुदत वाढीमुळे फायदा घेऊ शकतात. पीएम स्वानिधी म्हणजे काय: योजनेअंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी व्याज अनुदानासह 10,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

पहिल्यांदा घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यावर, पीएम स्वानिधीचे लाभार्थी दुसऱ्यांदा 20 हजार रुपयांपर्यंत आणि तिसऱ्यांदा 50 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी पात्र ठरतात.

पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी, रस्त्यावरील विक्रेत्यांना QR कोड, प्रशिक्षण आणि कॅशबॅक सुविधा प्रदान केली जाते.

चांगल्या पेमेंट पद्धती आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुक्रमे व्याज सबसिडी (7 टक्के p.a.) आणि कॅशबॅक (रु. 1,200 पर्यंत) स्वरूपात प्रोत्साहन दिले जात आहे.

10,000 रुपयांच्या कर्जासाठी 24 टक्के वार्षिक दराने, व्याज अनुदान प्रभावीपणे एकूण व्याजाच्या 30 टक्के आहे. वास्तविक अनेक तरुण तसेच होतकरू युवा या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारने या योजनेमध्ये वाढ केल्यामुळे अनेकांना पुन्हा एकदा कर्ज घेउन सत्कारणी लावण्यासाठी फायदा होणार आहे.