Take a fresh look at your lifestyle.

माजी मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली; भाजपाच्या महिला उमेदवाराला म्हणाले,’आयटम’!

0

Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :- मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आहेत. त्यातच आता काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या महिला उमेदवारावर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याने मोठा वाद तयार झाला आहे.भाजपने कमलनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Advertisement

डबरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांच्यावर आरोप करताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांची जीभ घसरली.

Advertisement

इमरती देवी यांच्यावर टीका करताना कमलनाथ यांनी त्यांचे नाव न घेता त्यांना आयटम असे संबोधले. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Advertisement

नेमकं काय म्हणाले कमलनाथ जाणून घ्या :- मध्य प्रदेशच्या डबरा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांचा प्रचार सुरू होता.याच मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार इमरती देवी निवडणूक लढवत आहेत. यावेळी प्रचाराच्या भाषणात बोलताना कमलनाथ म्हणाले, ‘सुरेश राजेजी आमचे उमेदवार आहेत. सरळ साध्या स्वभावाचे आहेत. हे त्यांच्यासारखे नाहीत. काय आहे त्यांचं नाव? मी तुम्हाला काय त्यांचं नाव सांगू. तुम्ही त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखता.ये क्या आयटम है’.

Advertisement

इमरती देवी माजी आमदार असून त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबतच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात.

Advertisement

मुख्यमंत्र्यांची कमलनाथांवर टीका :- कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह शेरेबाजीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी जोरदार टीका केली.ते म्हणाले, ‘कमलनाथजी इमरती देवी या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीचं नाव आहे जिने मोलमजुरी करुन सुरुवात केली.

Advertisement

pआज त्या राष्ट्रउभारणीच्या कामात आपलं योगदान देत आहेत. काँग्रेसने मला ‘भुकेला-नग्न’ म्हटलं आणि आता एका महिलेसाठी ‘आयटम’ शब्दप्रयोग करुन त्यांचे सामंतवादी विचार उघड झाले आहेत.’

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li