Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्र्यानी दिली खुशखबर… दसऱ्याच्या मुहूर्तावर जिम सुरु होणार !

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :-गेल्या 7 महिन्यापासून बंद असलेल्या जिम, व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी व्यवसायिकांनी वारंवार केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यानी एक महत्वाची माहिती दिली आहे.

Advertisement

दसऱ्यापासून जर सगळे मार्गदर्शक तत्वे काटेकोरपणे पाळले जाणार असतील तर राज्य सरकार जिम सुरू करण्यास परवानगी देईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम व्यवसायिकांना दिलं आहे.

Advertisement

सध्या राज्यभरात बार, हॉटेल्स, ग्रंथालय सुरू करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या व्यायाम शाळा कधी सुरू होणार? हा प्रश्न व्यायाम शाळा चालवणारे व्यवसायिक आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना पडला आहे.

Advertisement

ग्रंथालय सुरू करण्यास वाचन प्रेरणा दिवसाचा मुहूर्त साधला आता व्यायाम शाळांसाठी दसऱ्याचा मुहूर्त नक्की करा, अशी मागणी व्यायामशाळा व जिम मालकांनी मुख्यमंत्र्यांकडे या बैठकी दरम्यान केली. याला एकप्रकारे सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Advertisement

जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी, असंही उद्ध ठाकरे यांनी सांगितलंय.

Advertisement

या नियमांचे पालन करावे लागणार सुरक्षित शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारिरिक अंतर राखणे. व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे.

Advertisement

उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे. दररोज रात्री जिम, व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पुर्णपणे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li