Post office Scheme : आजघडीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोस्ट बँकेकडे पाहिले जाते. पोस्ट ऑफीसदेखील आपल्याला भरपूर योजना देऊ करते, ज्यामध्ये सुरक्षिततेसोबत मजबूत फायदादेखील दिला जातो.

दरम्यान पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्या खूप लोकप्रिय आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून कोणत्याही प्रकारचा धोका नाही. लाखो लोक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी एक ग्राम सुरक्षा योजना आहे. या योजनेसाठी तुम्ही दररोज 50 रुपयांची बचत करून 35 लाखांपर्यंत मिळवू शकता.

ग्राम सुरक्षा योजना काय आहे ते जाणून घ्या

ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना पूर्ण 35 लाखांचा लाभ मिळू शकतो. गुंतवणूकदाराला या योजनेची ही रक्कम 80 व्या वर्षी बोनससह मिळते. जर गुंतवणूक करणारी व्यक्ती 80 वर्षांच्या आधी मरण पावली, तर त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते. 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. यामध्ये 10,000 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर हप्ता भरू शकता.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना चार वर्षांनी कर्जाची सुविधा मिळते. जर एखाद्या पॉलिसीधारकाला ते सरेंडर करायचे असेल, तर पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षांनी ते सरेंडर केले जाऊ शकते. या योजनेतील गुंतवणुकीवर पाच वर्षांनंतर बोनसही मिळतो.

तुम्हाला किती मिळेल

जर एखाद्या पात्र व्यक्तीने या योजनेत दरमहा रु. 1.500 जमा केले. म्हणजेच रोज फक्त 50 रुपये खर्च करावे लागतात… योजनेच्या मॅच्युरिटीवर रु. 35 लाखांपर्यंत परतावा मिळू शकतो.