MHLive24 टीम, 06 फेब्रुवारी 2022 :- जवळपास प्रत्येक कमवत्या व्यक्तीस कर बचत करणे गरजेचे वाटते. प्रत्येकाचा कर बचत हा आर्थिक नियोजनाचा अत्यावश्यक भाग असतो. आपण आपली आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊनच कोठेही गुंतवणूक शहाणपणाने करावी जेणेकरून सर्वच दृष्टीने आपणास फायदा होइल. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो.(Tax Saving FD)

स्मॉल फायनान्स बँका बचत FD वर 6.75% व्याज दर देत आहेत. ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आपण अशा बँकबाबत माहिती घेऊ जिथे तुम्हाला कर बचतीचा सर्वाधिक फायदा मिळत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सध्या तुम्हाला टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वाधिक 6.75 टक्के व्याजदर देत आहे. यामध्ये तुम्ही पाच वर्षांत 1.5 लाख रुपये गुंतवून 2.10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळवू शकता.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर 6.40 टक्के व्याजदर देत आहे. यामध्ये 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करून, 5 वर्षांमध्ये पैसे 2.06 लाख रुपयांपर्यंत वाढवता येतात.

आरबीएल बँक

या खाजगी बँकेचा कर बचत ठेवींवर ६.३ टक्क्यांपर्यंत व्याज आहे. येथे 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करून 5 वर्षांत 2.05 लाख रुपये मिळू शकतात.

ड्यूश बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि येस बँक

या तिन्ही बँकांमध्ये 5 वर्षांच्या कालावधीवर 6.25 टक्के व्याजदर आहे. विदेशी बँकांमध्ये डॉइश बँक सर्वोत्तम व्याज देत आहे. या बँकांमध्ये 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करून 2.05 लाख रुपये मिळू शकतात.

इंडसइंड बँक

इंडसइंड बँक 5 वर्षांच्या कालावधीसह कर बचत ठेवींवर 6% पर्यंत व्याज दर देते. यामध्ये 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ही रक्कम 5 वर्षांत 2.02 लाख रुपये होईल. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC), आरबीआयची उपकंपनी, मुदत ठेवींवर गुंतवलेल्या रकमेवर म्हणजे 5 लाखांपर्यंतच्या FD वर हमी देते.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit