rakeshjhunjhunwala1200-sixteen_nine

Rakesh JhunJhunwala Portfolio : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते.

दरम्यान भारतातील मल्टीब्रँड फुटवेअर किरकोळ साखळी मेट्रो ब्रड्सने शुक्रवारी जोरदार रॅली पाहिली आणि 52 आठवड्यांच्या उच्चांकापर्यंत मजल मारली. या स्टॉकमधील ताज्या रॅलीमुळे, बिगबुल राकेश झुनझुनवालाच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी शुक्रवारच्या रॅलीमध्येच या स्टॉकमध्ये 221 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला हे मेट्रो ब्रँडचे सर्वात मोठे सार्वजनिक भागधारक आहेत. मेट्रो ब्रॅड्सच्या स्टॉकमध्ये पुढे जाऊन चांगली वाढ होण्याची शक्यता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शेअरची हालचाल पाहता कालच्या व्यवहारात NSE वर शेअर 5.16 टक्क्यांच्या वाढीसह 855.35 रुपयांवर बंद झाला. कालच्या व्यवहारात शेअर 836.00 रुपयावर उघडला, तर गुरुवारी शेअर 813.35 रुपयांवर बंद झाला..

या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 939.90 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 426.00 रुपये आहे. कंपनीचे सध्याचे प्रमाण 805,390 शेअर्स आहे. कंपनीचे मार्केट कॅप 23,222 कोटी रुपये आहे.

मेट्रो ब्रँड्सचे शेअर्स गेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी बाजारात लिस्ट झाले होते. या IPO ची किंमत 485 500 रुपये होती. हा IPO 3.64 पट सबस्क्राइब झाला. लिस्टिंग झाल्यापासून, बीएसईवर स्टॉक आतापर्यंत 76 टक्क्यांनी वाढला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत स्टॉक 91.5 टक्क्यांनी वाढला आहे. 30 जून 2022 पर्यंतच्या स्टॉकच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवर नजर टाकल्यास, राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या स्टॉकमध्ये 14.43 टक्के किंवा 39, 153,600 इक्विटी शेअर्स आहेत.