Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता.

दरम्यान BLS इंटरनॅशनलने आज NSE वर 18 टक्क्यांच्या वाढीसह 269.70 रुपयांची पातळी गाठली. विशेष म्हणजे नोमुरा सिंगापूरने खुल्या बाजारात कंपनीचे 11 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. या बातमीमुळे हा शेअर आज उत्साहात राहिला.

दुपारी 3.20 च्या सुमारास, NSE वर शेअर 30.70 रुपये किंवा 13.56 टक्क्यांच्या वाढीसह 258.90 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. शेअरचा दिवसाचा उच्चांक रु. 269.70 आहे तर दिवसाचा नीचांक रु. 242.20 आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 269.70 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 89.73 रुपये आहे. कंपनीचे सध्याचे 10,269,390 शेअर्स आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 5,322 कोटी रुपये आहे.

या शेअर्सच्या हालचालीवर नजर टाकल्यास, गेल्या 6 महिन्यांत यात 50 टक्के वाढ झाली आहे. तर बेंचमार्क निर्देशांक याच कालावधीत केवळ 5 टक्के चालला आहे. 29 ऑगस्ट 2022 रोजी, नोमुरा सिंगापूरने कंपनीतील 1.1 दशलक्ष शेअर्स किंवा 0.54 टक्के भागभांडवल विकत घेतले आहे. या खरेदीसाठी 25.3 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. ही खरेदी 230 रुपये प्रति शेअर या दराने करण्यात आली आहे.

बीएलएस इंटरनॅशनल ही आयटी क्षेत्रातील कंपनी आहे. जे देशातील सरकार आणि नागरिकांना व्हिसा, पासपोर्ट, नागरिकत्व, ई-गव्हर्नन्स, बायोमेट्रिक आणि ई- व्हिसा यासारख्या सेवा देण्यासाठी ओळखले जाते. कंपनी 2005 पासून या व्यवसायात आहे. कंपनीचे 46 हून अधिक सरकारी संस्था आणि दूतावासांशी व्यावसायिक संबंध आहेत.