Share-Market-today-1

Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता.

दरम्यान टाटा समूहाची कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी म्हणजेच आयएचसीएलचे शेअर्स गेल्या वर्षभरात मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. नुकत्याच झालेल्या तेजीसह, IHCL च्या स्टॉकने गेल्या एका वर्षात 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.. गुरुवार, 18 ऑगस्टच्या सकाळच्या दराशी तुलना करता, स्टॉकने एका वर्षात 104 टक्के आणि या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात, IHCL चा स्टॉक सुमारे 1 टक्क्यांनी वाढला आहे आणि तो 278 रुपयांच्या पातळीवर राहिला आहे.

हॉस्पिटॅलिटी कंपनीने एप्रिल-जून 2022 या तिमाहीत आतापर्यंतचे सर्वोत्तम त्रैमासिक निकाल पोस्ट केले. IHCL ने जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत रु. 170 कोटींचा करानंतरचा एकत्रित नफा (PAT) नोंदवला. मागील वर्षी याच कालावधीत रु. 277 कोटी तोटा झाला होता. त्याच वेळी, कंपनीचा महसूल 249.45 टक्क्यांनी वाढून 1,293 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे.

महामारीमुळे मार्च 2020 मध्ये देशव्यापी लॉकडाऊनमुळे मोठा झटका आलेल्या IHCL ने आपल्या व्यवसायात मोठी पुनर्प्राप्ती नोंदवली आहे. मार्च 2020 मध्ये हॉटेल आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित उपक्रम ठप्प झाले होते.

जेफरीजने खरेदीचा सल्ला दिला

जेफरीजने IHCL वरील नुकत्याच दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, कंपनीचे नेतृत्व स्थान, मालमत्ता मिश्रण, सुधारित मार्जिन प्रोफाइल आणि चांगली ताळेबंद यामुळे कंपनी एक मजबूत गुंतवणूक कथा आहे. जेफ्रीजने आपल्या अहवालात आयएचसीएलसाठी ३२५ रुपयांच्या लक्ष्यासह खरेदी सल्ला कायम ठेवला आहे. अशा प्रकारे स्टॉक सध्याच्या किमतीवर 17 टक्के परतावा देऊ शकतो.

जेफ्रीस म्हणाले, “गेल्या सहा महिन्यांत/वर्षभरात भारतीय हॉटेल्समध्ये जोरदार रॅली असल्याने, किमतींमध्ये पूर्ण पुनर्प्राप्ती केव्हा होईल यावर चर्चा केली जात आहे. आमचा विश्वास आहे की IHCL प्रीमियमवर व्यापार करत राहू शकेल.