postoffice2-1577687790-1591758329

आजघडीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोस्ट बँकेकडे पाहिले जाते. पोस्ट ऑफीसदेखील आपल्याला भरपूर योजना देऊ करते, ज्यामध्ये सुरक्षिततेसोबत मजबूत फायदादेखील दिला जातो.

दरम्यान आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पोस्ट ऑफिस नाही. बदलत्या काळानुसार पोस्ट ऑफिसमध्येही बदल झाला आहे. पोस्ट ऑफिसमध्ये (पोस्ट ऑफिस स्कीम) सर्व सुविधा उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला कोणत्याही बँकेत मिळतात.

इतकंच नाही तर तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:ला अपडेट ठेवण्यासाठी पोस्ट ऑफिस सतत काहीतरी नवं करत असतं. पोस्ट ऑफिस अशा योजना राबवत असल्याने सर्वसामान्यांना बँकेसारख्या सुविधा मिळत आहेत. तसेच, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथे तुम्हाला पोस्ट ऑफिस योजनेतून जोरदार परतावा देखील मिळतो.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS)

पोस्ट ऑफिसच्या नियमित मासिक उत्पन्न योजनेत ग्राहकाला 6.60 टक्के व्याज मिळते. हे व्याज आर्थिक वर्ष ते आर्थिक वर्ष बदलते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला त्याच्या खात्यात किमान 1000 रुपये ठेवावे लागतील. त्याच वेळी, ग्राहक खात्यात जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये ठेवू शकतो. दुसरीकडे, संयुक्त खात्यात (पोस्ट ऑफिस जॉइंट अकाऊंट) 9 लाख रुपयांपर्यंत जमा केले जाऊ शकते.

पोस्ट ऑफिस बचत खाते

पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडल्यावर ग्राहकाला वार्षिक 4% व्याज मिळते. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 500 रुपयांच्या रोख रकमेसह बचत खाते उघडू शकता. यासोबतच पोस्ट ऑफिसमध्ये संयुक्त खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध आहे. हे खाते उघडल्यानंतर तुम्हाला चेकबुक, एटीएम कार्ड, ई-बँकिंग, मोबाइल बँकिंग, आधार सीडिंग, अटल पेन्शन योजना पंतप्रधान इत्यादींचा लाभ देखील मिळतो.

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ची संपूर्ण माहिती

ज्येष्ठ नागरिक बचत योजना किंवा POSCSS योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जाते. या योजनेचा कालावधी ५५ वर्षांचा आहे. या योजनेत ७.४ टक्के व्याज उपलब्ध आहे. व्याज तिमाही आधारावर मिळते. ही खाती उघडताना लक्षात ठेवा की त्या तारखेला व्यक्तीचे वय ६० वर्षे पूर्ण झालेले असावे. SCSS योजनेतील गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत फायदे प्रदान करते.

पाच वर्षांची आवर्ती ठेव

पोस्ट ऑफिसमध्ये आवर्ती ठेव खाते दरमहा किमान 100 रुपयांच्या गुंतवणुकीसह उघडता येते. पोस्ट ऑफिस RD वर सध्याचा व्याज दर 5.8% वार्षिक आहे. 10 वर्षांवरील अल्पवयीन आणि मतिमंद व्यक्तीच्या नावाने खाते एकट्याने किंवा संयुक्तपणे उघडले जाऊ शकते.