Share Market tips : जागतिक स्तरावर मंदी आणि चलनवाढीची भीती रोखण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ केल्याने ज्या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे, तो म्हणजे आयटी. 2022 च्या सुरुवातीपासूनच आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव आहे. निपटी आयटी निर्देशांक या वर्षात आतापर्यंत सुमारे 30 टक्क्यांनी घसरला आहे. तर बेंचमार्क निर्देशांक या काळात केवळ 2.5 टक्क्यांनी घसरला आहे.

तथापि, ब्रोकरेज PhillipCapital च्या मते, या आयटी कंपन्यांचे निकाल दुसऱ्या तिमाहीत मजबूत असणार आहेत, त्यानंतर त्यांच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ शकते. ब्रोकरेजने त्यांचे काही आवडते आयटी स्टॉक्स देखील सूचीबद्ध केले आहेत आणि त्यांच्यासाठी लक्ष्य किमती निश्चित केल्या आहेत. हे पाहूया

1. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)

ब्रोकरेजने TCS स्टॉकवर 4,200 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह खरेदीची शिफारस केली आहे, जी सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे 35.6 टक्के जास्त आहे.

2. इन्फोसिस

ब्रोकरेजने इन्फोसिसच्या स्टॉकवर रु. 1,930 च्या लक्ष्य किंमतीसह खरेदी कॉल केला आहे. स्टॉकच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा हे प्रमाण सुमारे 35.15 टक्क्यांनी जास्त आहे.

3. माइंडट्री

ब्रोकरेजने Mindtree स्टॉकवर 4,350 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह खरेदीची शिफारस केली आहे. जी सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे 34 टक्के जास्त आहे.

4. L&T इन्फोटेक

ब्रोकरेजने L&T इन्फोटेक स्टॉकवर 5,440 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह खरेदी कॉल केला आहे. जो त्याच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे 18.67 टक्के जास्त आहे.

5. पर्सिस्टंट सिस्टम्स

ब्रोकरेजकडे पर्सिस्टंट सिस्टीम्स स्टॉकवर 4,420 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह खरेदी कॉल आहे. स्टॉकच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा हे प्रमाण सुमारे 35.15 टक्क्यांनी जास्त आहे.

इतर तज्ञांचे मत काय आहे?

आनंद जेम्स, चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस यांनी नुकत्याच केलेल्या संवादात सांगितले की, आयटी शेअर्सचा कल काही काळापासून बदलत आहे. अशा स्थितीत आयटी शेअरमध्ये दिलासादायक तेजी येण्याची शक्यता आहे.