7th Pay commission
7th Pay commission

7th Pay commission : केंद्र सरकार असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे की ज्याचा तब्बल लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. होय केंद्र सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेणार आहे.

वास्तविक केंद्र सरकार देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी देणार आहे. लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील महागाई भत्ता डीए वाढवण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही वाढ 1 जुलै 2022 पासून होण्याची शक्यता आहे. 1 जुलै 2022 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होऊ शकते.

यापूर्वी असे मानले जात होते की महागाई भत्त्यात 4% वाढ होईल. परंतु, औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या अलीकडील आकडेवारी पाहता, असे मानले जाते की महागाई भत्त्यात 4 टक्क्यांहून अधिक वाढ केली जाऊ शकते.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळतो. यापूर्वी ते 38 टक्क्यांपर्यंत वाढवणे अपेक्षित होते. मात्र आता महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे मानले जात आहे.

एप्रिल महिन्यातील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हा अंदाज वर्तवला जात आहे. देशातील वाढती महागाई पाहता जुलै महिन्यात सरकार महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा विचार करत आहे.

असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत वाढवल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 8,000 रुपयांवरून 27,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांवर होणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात हा भत्ता दिलासा देणारा ठरणार आहे.

सर्वसाधारणपणे 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढवण्याचा ट्रेंड आहे, अशा स्थितीत जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट मिळू शकते.

केंद्र सरकार किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या आधारे जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा DA आणि DR मध्ये सुधारणा करते.

देशातील महागाईने सरकारने ठरवून दिलेले लक्ष्य ओलांडले आहे. किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये 6.95 टक्क्यांवरून एप्रिलमध्ये 7.79 टक्क्यांवर पोहोचला.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्के वाढ झाली होती, ती आता ३४ टक्के झाली आहे. केंद्र सरकारने मार्च 2022 अखेर आपल्या कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’मध्ये वाढ केली होती. नवीन दर 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत.