Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

केंद्र सरकारकडून करदात्यांना दिलासा; टॅक्सशी संबंधित ‘ह्या’ 12 कामांची डेडलाइन वाढवली

0 0

MHLive24 टीम, 26 जून 2021 :-  वित्त मंत्रालयाने आयकर संबंधित अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यापैकी बहुतेक कोरोना संकटाच्या समस्येमुळे येणाऱ्या समस्यांमुळे सवलती दिल्या आहेत. ज्यामध्ये पॅन आधार कार्ड लिंक , टीडीएस प्रमाणपत्र, ‘विवाद ते विश्वास’ यासारख्या आणखी 10 योजना आहेत ज्यांची मुदत वाढविण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवीन तारखांची घोषणा केली आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल-

Advertisement
 • – पॅन-आधार लिंकची अंतिम मुदत तीन महिन्यांनी अर्थात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
 • – डायरेक्‍ट कर विवादांच्या निराकरणासाठी आणलेली ‘विवाद ते विश्वास’ या योजनेची मर्यादा 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. व्याजासह पेमेंट 31 ऑक्टोबर पर्यंत करता येईल.
 • – इंप्‍लॉयरकडून फॉर्म 16 मध्ये टीडीएस सर्टिफिकेट देण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2021 वरून 31 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
 • – नॉन टीडीएस स्टेटमेंट जसे की फॉर्म 15 जी / 15 एच ची अपलोडिंग 15 जुलैऐवजी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत केले जाऊ शकते.
 • – सेक्शन 144सी अंतर्गत डेट रेजोल्‍यूशन पॅनल ला ऑब्जेक्शन साठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
 • – कर कपातीसाठी निवासी घरातील गुंतवणूकीची वेळ 3 महिन्यांहून अधिक मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल.
 • – ऑर्डर पास करणे, मूल्यांकन करणे आणि दंड आकारण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती, जी आधी 30 जून होती.
 • – ऑथ्‍राइज्‍ड डीलरकडून 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत पैसे पाठविल्यास फॉर्म क्रमांक 15 सीसी मधील त्रैमासिक विधान आता 31 जुलै 2021 पर्यंत सादर केले जाऊ शकते.
 • – इक्वीलायझेशन लेवी रिटर्न्सवर प्रक्रिया करण्यासाठी आता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वेळ असेल.
 • – आर्थिक वर्ष 2020-21 साठी फॉर्म क्रमांक 1 मधील इक्विलाइजेशन लेवी स्टेटमेंट आता 31 जुलै 2021 पर्यंत दाखल करता येईल.
 • – ट्रस्ट/इंस्टीट्यूशंस/रिसर्च एसोसिएशंस आदींच्या रजिस्ट्रेशन/प्रोविजनल रजिस्ट्रेशन/इंटीमेशन/अप्रूवल/प्रोविजनल अप्रूवलसाठी फॉर्म नंबर 10ए/फॉर्म नंबर 10एबी मध्ये सेक्शन 10(23सी), 12एबी, 35(1)(ii)/(iiए)/(iii) आणि 80 जी अंतर्गत एप्लीकेशनची नवीन डेडलाइन 31 ऑगस्ट 2021 ठेवली आहे.
 • – इनकम टॅक्स सेटलमेंट कमिशनकडून प्रलंबित प्रकरणे मागे घेण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
 • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
 • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup