Electric car : पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.

दरम्यान इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिक स्वातंत्र्य दिनानिमित्त आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणू शकते. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. पुढील उत्पादन कार असेल असे त्यांनी सांगितले. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता त्याची घोषणा होईल.

आम्ही तुम्हाला सांगतो की या ट्विटमध्ये एक व्हिडिओ देखील आहे ज्यामध्ये बाजूला एक लाल रंगाची कार दिसत आहे. इलेक्ट्रिक कार व्यतिरिक्त, कंपनी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आणखी दोन उत्पादने सादर करणार आहे. यापैकी एक S1 Pro स्कूटरची परवडणारी आवृत्ती असू शकते. यासोबत कंपनी नवीन सुविधेची घोषणा करू शकते. जिथे ओला इलेक्ट्रिक कार आणि तिची बॅटरी विक्री केली जाईल. याआधी अग्रवाल यांनी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी इलेक्ट्रिक कारचा टीझर सादर केला होता. यामध्ये त्यांनी सांगितले होते की हे भविष्यातील वाहन आहे जे लहान हॅचबॅक कारसारखे असेल.

सिंगल चार्जमध्ये 500 किमी धावेल
ओलाच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या डिझाईनबद्दल काहीही सांगता येणार नाही. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की ते एका चार्जमध्ये 500 किमी पर्यंत जाऊ शकते. मात्र त्याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. तथापि, अग्रवाल यांनी यापूर्वी खुलासा केला होता की ओला इलेक्ट्रिक देशातील सर्वात स्पोर्टी कार बनवत आहे.

त्याच वेळी, कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी लॉन्च केली होती. कंपनीने त्यावेळी Ola S1 आणि S1 Pro या दोन स्कूटर सादर केल्या होत्या. पण सध्या कंपनी फक्त Ola S1 Pro ची विक्री करत आहे.