आता व्हॉट्सअ‍ॅपवर ‘ही’ बँक २४ तास देणार सुविधा; केवळ एका मॅसेजवर मिळतील खूप सुविधा

MhLive24 टीम , 25 जुलै  2020 :- येस बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. या बँकेने ग्राहकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर बँकिंग सेवा सुरू केल्या आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅशलेस, डिजिटल व्यवहार आदी गोष्टी अग्रक्रमाने पुढे येत आहेत.  

डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांसाठी बँकिंग व्यवहार सोपे करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.  ही सेवा 24 तास सुरू राहणार असून एका मॅसेजवर  60 पेक्षा अधिक सुविधा मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

* व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणारं या सुविधा –

Advertisement

१) एका मॅसेजवर सेविंग अकाउंटचा बॅलेन्स चेक करू शकता
२) काही कालावधीपर्यंतचे घेणं-देणं झालेले किंवा डिजिटल बँकिंग व्यवहार पाहू शकता
३) एफडी वर कर्ज घेऊ शकता, चेक बुक ऑर्डर करू शकता, अवैध व्यवहाराची तक्रार करू शकता
४) ईमेल किंवा कॉल द्वारे कॉन्टेक्ट सेंटरशी कनेक्ट राहू शकता
५) पीएम केअर्स फंड मध्ये डोनेट करू शकता, त्याचबरोबर कोविड-19 रिलीफ मधेही डोनेट करू शकता

* अशा पद्धतीने करा ऍक्टिव्हेट
येस बँकेच्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगची सेवा सुरू करुन घेण्यासाठी 91-829-120-1200 या नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला ही सेव्हा सुरु करण्यासाठी एका लिंकसह एसएमएस येईल. 91-829-120-1200 हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा.

त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करून या नंबरवर ‘Hi’ असा मेसेज करा. या व्यवहाराच्या सुरक्षेबाबातही बँक विशेष सक्रिय आहे. यामध्ये केले जाणारे मेसेज एंड टु एंड एनक्रिप्शनने सुरक्षित असतील असा दावा बँकेने केला आहे.

Advertisement

त्याचप्रमाणे या यामध्ये नावापुढील ग्रीन बॅजमुळे हे सुनिश्चित होत आहे की, बँकेच्या व्हेरिफाइड अकाउंटबरोबर ग्राहकाची बातचीत सुरू आहे.

* या बँकांनीही सुरु केलीये ही सुविधा  
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार सुरु केले आहेत. ही लक्षात घेऊन अनेक बँकांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल सुविधा सुरु केली आहे.या बँकांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआई बँक, कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि आरबीएल बँकेचा समावेश आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker