Fixed Deposit : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक बँका सध्या आपले व्याजदर वाढवत आहेत. अशातच मागच्या काही दिवसात अनेक बॅंकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केलेली आहे. FD मध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित असते आणि परतावाही आधीच ठरलेला असतो.

दरम्यान भारतातील अनेक बँकांनी कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांचे एफडी दर वाढवले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) गेल्या तीन बैठकांमध्ये रेपो दर वाढवल्यानंतर बहुतांश बँकांनी एफडी दर वाढवले आहेत. RBI ने रेपो रेटमध्ये 140 बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढ केली आहे.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक •ऑफ इंडिया (SBI) ने ठराविक कालावधीसाठी FD वर व्याजदर वाढवले आहेत. एसबीआयचे नवीन एफडी दर गेल्या आठवड्यापासून लागू • झाले आहेत. SBI चे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयापेक्षा कमी FD वर लागू होतील. बँक 6.10 टक्के व्याजदराने FD ऑफर करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना FD वर 6.60 टक्के मिळेल.

BOB

बँक ऑफ बडोदाने 444 दिवसांसाठी FD वर 5.75 टक्के व्याजदर देणारी तिरंगा ठेव योजना सुरू केली. योजनेअंतर्गत 555 दिवसांच्या ठेवींवर 6 टक्के व्याजदर असेल. ही योजना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी आहे. यामध्ये तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत FD मिळवू शकता. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ०.५ टक्के अधिक व्याज मिळणार आहे.

कॅनरा बँक

आणखी एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक कॅनरा बँक 666 दिवसांसाठी FD वर 6 टक्के व्याजदर देत आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) 1,111 दिवसांच्या ठेवींवर 5.75 टक्के व्याजदर देत आहे..

या बँकांनी एफडीवरील व्याजही वाढवले

खासगी क्षेत्रातील अनेक बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक HDFC एक दिवस ते 10 वर्षे ते 5 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 5.75 टक्के व्याजदर देत आहे. ICICI बँक देखील याच कालावधीसाठी 5.75 टक्के व्याजदर देत आहे. अक्सिस बँक 17-18 महिन्यांसाठी ठेवींवर 6.05 टक्के व्याज देत आहे. कोटक महिंद्रा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यासारख्या इतर बँकांनीही त्यांच्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे.