Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री मंडळाने त्यांची संपत्ती जाहीर केली आहे. या घोषणेनुसार 30 जून 2020 पर्यंत पंतप्रधान मोदींची संपत्ती 2.85 कोटी रुपयांवर गेली आहे. सन 2019 च्या तुलनेत त्यात 36 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

पंतप्रधानांनी ज्या बचत पर्यायांमध्ये पैसा जमा केला त्यातील एक म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (नेशनल सेविंग्स सर्टिफिकेट) म्हणजे एनएससी. पीएम मोदी यांची पोस्ट ऑफिस एनएससीमध्ये 843124 रुपयांची गुंतवणूक आहे.आता आपण जाणून घेऊयात की एनएससी हा गुंतवणूक आणि बचतीसाठी एक विश्वासार्ह पर्याय आहे कि नाही याविषयी

मॅच्युरिटी पीरियड आणि व्याज दर

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा सध्याचा इश्यू VIII इश्यू आहे. एनएससीचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. सध्याचा वार्षिक व्याज दर 6.8 टक्के आहे. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते आणि देय रक्कम मैच्योरिटीला दिले जाते.

एनएससीमध्ये गुंतवणूक किमान 1000 रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते. कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नाही.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा प्लॅन (NSC ) कोण घेऊ शकते ?  

एनएससी सिंगल किंवा ज्वॉइंटमध्ये तसेच दहा वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नाबालिकच्या नावाने प्रौढ व्यक्तीद्वारे, तसेच मानसिकरीत्या अपंग व्यक्तीच्या नावावर पालकांद्वारे हा प्लॅन घेता येतो. यात पासबुक दिले जाते.

टॅक्स सूट व अन्य फीचर्स

  • NSC केवळ पोस्ट कार्यालयातच मिळते
  • NSC मधील गुंतवणुकीवर  सेक्शन 80C अंतर्गत टॅक्सवर सूट मिळते
  • NSC एखाद्या व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे  हस्तांतरित करता येते
  • एनएससी सिंगल किंवा ज्वॉइंटमध्ये तसेच दहा वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नाबालिकच्या नावाने प्रौढ व्यक्तीद्वारे, तसेच मानसिकरीत्या अपंग व्यक्तीच्या नावावर पालकांद्वारे हा प्लॅन घेता येतो. यात पासबुक दिले जाते.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology