Share Market update : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी एलआयसीने गुरुवारी, २९ सप्टेंबर रोजी रासायनिक उत्पादन कंपनी दीपक नायट्रेटमधील आपला हिस्सा वाढवण्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारे, LIC ची दीपक नायट्रेटमधील भागीदारी भरलेल्या भांडवलाच्या 5.028 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. यापूर्वी, दीपक नायट्रेटमध्ये आयुर्विमा कंपनीची हिस्सेदारी 4.977 टक्के होती.

दीपक नायट्रेटचा स्टॉक गेल्या वर्षभरात १७ टक्के, सहा महिन्यांत ११ टक्के आणि ५ दिवसांत ८ टक्के घटला आहे.

LIC कडे आता 68,58,414 इक्विटी शेअर्स म्हणजेच कंपनीचे 5.028 टक्के स्टेक आहेत, पूर्वी 67, 88,327 इक्विटी शेअर्स म्हणजेच 4.977 टक्के शेअर्स होते.

LIC ने 28 सप्टेंबर रोजी ट्रेडिंग तासांदरम्यान सरासरी 2,074.49 रुपये प्रति शेअर या दराने करार केला. दीपक नायट्रेट हा सेंद्रिय, अजैविक, सूक्ष्म आणि विशेष रसायनांचा अग्रगण्य उत्पादक आहे.

LIC आणि दीपक नायट्रेट या दोघांचे शेअर्स घसरले

दीपक नायट्रेटचा शेअर गुरुवारी बीएसईवर 3.29 टक्क्यांनी घसरून 2,008 रुपयांवर बंद झाला. दीपक नाइट्राइटचे मार्केट कँप सुमारे 27,388 कोटी रुपये आहे. दुसरीकडे, एलआयसीचे शेअर्स 0.30 टक्क्यांनी घसरून 619.30 रुपयांवर बंद झाले.