share-market-investment-plan_202207854862

Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता.

दरम्यान इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) चे शेअर्स आज सकाळी 4 टक्क्यांहून अधिक वाढले कारण त्यांनी महसूल आणि नफा मिळविण्यासाठी आपली डेटा मालमत्ता विकण्यासाठी निविदा काढली. त्यानंतर एका दिवसानंतर म्हणजे शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी, स्टॉक मध्ये एक उसळी आली.

आज BSE वर IRCTC चे शेअर्स 712 रुपयांवर उघडले. ते आतापर्यंतच्या सत्रादरम्यान रु. 746.75 च्या इंट्राडे उच्च आणि रु. 967.75 च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहेत. आज सकाळी 10:53 वाजता BSE वर IRCTC चे शेअर 4.34 टक्क्यांनी वाढून 744 रुपयांवर व्यवहार करताना दिसले.

भारतीय रेल्वेची तिकीट शाखा डिजिटल कमाईद्वारे 1,000 कोटी रुपयांनी महसूल वाढवण्याची योजना आखत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की IRCTC कडे डिजिटल डेटाचे प्रचंड भांडार आहे जे IRCTC साठी कमाईच्या अनेक संधी उघडते.

वृत्तानुसार IRCTC ने आपला डिजिटल डेटा विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच चॅनलने असेही सांगितले होते की, IRCTC कडून डेटाच्या विक्रीसाठी टेंडरही जारी करण्यात आले आहे. या निविदे अंतर्गत कंपनीच्या वेबसाइटच्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती नियमांनुसार कोणाशीही शेअर केली जाणार नाही.

IRCTC एक PSU जी भारतीय रेल्वेसाठी केटरिंग आणि पर्यटन सेवांव्यतिरिक्त तिकीट सुविधा प्रदान करते. रेल्वे तिकीट क्षेत्रात त्याची मक्तेदारी आहे.

जून अखेर संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 198 टक्क्यांनी वाढ होऊन 245.52 कोटी रुपये झाला आहे.

IRCTC चे ऑपरेशन्समधील उत्पन्न 250.34 टक्क्यांनी वाढून 852.59 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर Q1FY22 मध्ये कंपनीचे उत्पन्न 243.36 कोटी रुपये होते.