Mhlive24 टीम, 19 ऑक्टोबर 2020 :- आज भारतीय बाजार निर्देशांकानी वित्तीय, मेटल आणि एफएमसीजी स्टॉक्सच्या नेतृत्वात सलग दुस-या दिवशी वाढ नोंदवली. निफ्टीने ०.९४% किंवा ११०.६० अंकांची वृद्धी घेतली व तो १२,००० अंकांच्या पातळीजवळ म्हणजेच ११,८७३.०५ अंकांवर स्थिरावला.

एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.१२% किंवा ४४८.६२ अंकांनी वाढला व ४०,४३१.६० अंकांवर स्थिरावला. आज जवळपास १४७० शेअर्सनी वृद्धी घेतली तर ११५० शेअर्स घसरले. तर १४८ शेअर्स स्थिर राहिले.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह :-यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात आयसीआयसीआय बँक (५.०१%), अॅक्सिस बँक (४.२०%), नेस्ले (४.४७%), एसबीआय (४.११%), आणि गेल (४.१७%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे डिव्हिस लॅब (३.७५%), आयशर मोटर्स (३.०४%), हिरो मोटो (२.७०%), सिपला (२.३६%), आणि बजाज ऑटो हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

निफ्टी फिन सर्व्हिस, निफ्टी मेटल आणि निफ्टी एफएमसीजीनंतर निफ्टी बँक हे चांगली कामगिरी करणारे सेक्टर ठरले. निफ्टी फार्मा, निफ्टी ऑटो आणि आयटी सेक्टर्सनी लाल रंगात कामगिरी केली. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉल कॅप अनुक्रमे ०.५८% आणि ०.४३% नी वधारले.

बँक ऑफ महाराष्ट्रा लि.: बँक ऑफ महाराष्ट्रा लि. कंपनीचे स्टॉक्स ७.१७% नी वाढले व त्यांनी ११.९५ रुपयांवर व्यापार केला. बँकेचा निव्वळ नफा १३.४% नी वाढला व १३०.१ कोटी रुपये झाला. तसेच बँकेचे निव्वळ उत्पन्न ४.४% नी वाढले व ते ११२०.४ कोटी रुपये झाले.

अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स लि.: अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. कंपनीचे स्टॉक्स ५.७९% नी वाढले व २०९९ रुपयांवर स्थिरावले. कंपनीने उत्पन्नात महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्याचे नोंदवल्यानंतर हे परिणाम दिसले. डी मार्ट रिटेल चेन ऑपरेटरने २०२१ या वित्तवर्षातील दुसऱ्या तिमाहीत १९८.५४ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे नोंदवले.

डीएचएफएल: कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी चार जणांनी बोली लावली. त्यानंतर देवान हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. (डीएचएफएल) कंपनीचे स्टॉक्स ९.९२% नी वाढले व त्यांनी १३.८५ रुपयांवर व्यापार केला.

फेडरल बँक लि.: बँकेने सप्टेंबरमधील तिमाहित नफ्यात २६.२% घसरण दर्शवली. तर निव्वळ मालमत्ता मूल्यही सुधारले. हे मूल्य २.८४% नी वाढले तर वित्तवर्ष २०२१ च्या दुस-या तिमाहीत एनपीए ०.९९% नी घसरले. त्यानंतर बँकेचे स्टॉक्स ७.४७% नी वाढले व त्यांनी ५६.१० रुपयांवर व्यापार केला.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि.: ग्लेनमार्क फार्मा कंपनीने यूएसएफडीएकडून सिरोलिमस टॅबलेट्स या रॅपाम्यूनच्या जेनेरिक व्हर्जनसाठी अंतिम मंजूरी मिळवल्यानंतरही कंपनीचे स्टॉक्स २.५३% नी घसरले व त्यांनी ४७८.५० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात आजच्या सत्रात खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ६ पैशांनी घसरण घेत ७३.४० रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजार: जगभरात वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येमुळे गुंतवणुकदारांच्या जोखिम घेण्याच्या प्रमाणावरही परिणाम झाला. त्यामुळे जागतिक बाजाराने संमिश्र संकेत दिले. नॅसडॅकने ०.३६% ची तर एफटीएसई १०० ने ०.२२% ची घसरण घेतली.

तर दुसरीकडे एफटीएसई एमआयबी , निक्केई २५ आणि हँगसेंग कंपनीचे स्टॉक्स अनुक्रमे ०.१५%, १.११% आणि ०.६४% नी वधारले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology