MHLive24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- असं म्हटलं जातं की खूप पैसे कमवायचे असतील तर नोकरी सोडून व्यवसाय केला पाहिजे. तसा जमाना पण तर स्टार्टअपचा आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीपासून कंटाळला असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही आयडीया देणार आहोत त्याने आजची तरूण पिढी लाखो रुपये कमवू शकते.

तुम्ही मनात आणलं तर घर बसल्या लाखो रुपये कमवू शकता. अनेक उच्चशिक्षित युवकांनी नोकरी सोडून शेतीतून हे सिद्ध करून दाखवलं आहे की, पारंपारिक शेती केल्याने आपण आपलं भविष्य घडवू शकतो. तसं पहायला गेल तर आताची शेती ही तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. तंत्रज्ञानातून शेती करत आज अनेक युवक मालामाल झाले आहेत. उदा. इस्त्रायलमध्ये आता मोठ्या इमारतींच्या भींतीवर भात, मका, गहू आणि इतर भाज्यांची शेती केली जाते. त्यातून मोठ्या प्रमाणात त्यांना नफा होतो.

यातच एक म्हणजे हळदीची व्यावसायिक शेती आहे. हळद ही औषधं आणि मसाल्याच्या रूपात वापरली जाते. गेल्या काही वर्षांपासून, बाजारात सतत हळदीची मागणी वाढत आहे. यापूर्वी फक्त खरीपमध्येच शेती केली जायची, पण आता त्यात प्रगती झाली आहे. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास तुम्ही सहजरित्या हळदीच्या व्यवसायातून पैसे कमवू शकता. जाणून घेऊयात या शेतीविषयी काही माहिती

खतांचे व्यवस्थापन :-  हळद पिकासाठी हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश अशी रासायनिक खतांची शिफारस आहे. शिफारशीप्रमाणे संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीवेळी दिले असेल. नत्र २ समान हप्त्यात विभागून देण्याची शिफारस आहे. त्यातील पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी दिला असेल.

आता दुसरा हप्ता भरणी वेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) देण्याची शिफारस आहे. भरणीवेळी हेक्टरी २१५ किलो युरिया, २५ किलो फेरस सल्फेट द्यावे. २ टन निंबोळी किंवा करंजी पेंड (ऑईल केक) द्यावी. भरणी करताना खते दिल्यामुळे खते योग्यरीत्या मातीत मिसळली जातात.

शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर हळद पिकास कोणतेही नत्रयुक्त रासायनिक खत (उदा. युरिया इ.) देऊ नये. अशी खते दिल्यास हळदीची अतिरीक्त शाकीय वाढ होते. परिणामी हळद पिकाची पुढील अवस्था उदा. हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन वाढणे लांबणीवर पडतात. ज्याठिकाणी पोटॅशयुक्त खतांची कमतरता असेल त्याठिकाणी हेक्टरी १२५ किलो पांढरा पोटॅश द्यावा. हळकुंडांचे वजन वाढून हळकुंडांना चकाकी येते.

पाणी व्यवस्थापन 

पावसाच्या स्थितीमध्ये पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी साठून राहिल्यास मुळांना हवा (ऑक्सिजन) घेण्यास अडथळा उद्भवतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल पडतात. साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा होईल, असे नियोजन करावे.

रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा.

जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा राहिल्यास हळकुंडे कुजतात. त्यामुळे कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव होत असतो.

पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. आठ महिने होईपर्यंत जमिनीच्या मगदुराप्रमाणे हळद पिकास पाणी देत रहावे. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते.

बेण्याची निवड

बेण्याची सुप्तावस्था संपलेली असावी.
बेण्यावरील एक ते दोन डोळे चांगले फुगलेले असावेत.
मातृकंद बेणे ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, तर – – हळकुंडे ३० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची असावीत.
बेणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे.
बेण्याची उगवण एकसारखी होण्यासाठी लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर बेण्यावरती पाणी मारावे.
बेण्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाला असल्यास बेणे मऊ पडते. असे मऊ बेणे कापले असता आतमधील – भाग कापसासारखा दिसतो. असे बेणे उगवत नाही बीजप्रक्रियेच्या द्रावणात तरंगते.
मातृकंद बेणे त्रिकोणाकृती असावे.
बेण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी.
बेण्यावरील मुळ्या, गतवर्षीच्या पानाचे अवशेष साफ करून बियाणे स्वच्छ करावे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup