Government Scheme
Government Scheme

Government Scheme : सरकार नागरिकाना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना आणत असते. या योजनाद्वारे सरकार सामान्य नागरीकांना विविध सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करते. या योजनांचा भरपूर प्रसार देखील झाला आहे.

जर तुम्हाला पैसे गुंतवून पैसे कमवायचे असतील, परंतु बाजारातील जोखमीची भीती वाटत असेल, तर तुमच्यासाठी सरकारी योजनांमध्ये चांगले पर्याय आहेत. जेव्हा आपण सरकारी योजनांबद्दल बोलतो तेव्हा पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना सुरक्षित आणि हमी परताव्यासाठी उत्तम गुंतवणूक आहेत.

पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना (KVP) ही अशी बचत योजना आहे, ज्यामध्ये ठराविक वर्षानंतर तुमचे पैसे दुप्पट होतात. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी किसान विकास पत्र योजना सर्वोत्तम आहे. यामध्ये तुमचे जमा केलेले पैसे नेहमी पूर्णपणे सुरक्षित असतील. या योजनेत ग्राहकाचे पैसे १२४ महिन्यांत दुप्पट होतात. तसेच तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे.

KVP: एकदा जमा केल्यावर विसरा

विकास विकास पत्र ही अशी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकरकमी पैसे जमा करून विसरता आणि 10 वर्ष 4 महिन्यांनंतर म्हणजेच 124 महिन्यांनंतर तुमचे पैसे दुप्पट होतील. सध्या किसान विकास पत्रावरील व्याज दर वार्षिक ६.९ टक्के आहे. कंपाउंडिंग दरवर्षी केले जाते. किसान विकास पत्र (KVP) मध्ये प्रमाणपत्राच्या स्वरूपात गुंतवणूक केली जाते. यामध्ये तुम्ही किमान रु. 1,000 आणि नंतर रु. 100 च्या पटीत गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.

कोण खाते उघडू शकते

18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली कोणतीही भारतीय व्यक्ती किसान विकास पत्र मध्ये आपले खाते उघडू शकते. तथापि, खाते उघडण्यासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही. केव्हीपी प्रमाणपत्र अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने देखील खरेदी केले जाऊ शकते. 10 वर्षांवरील अल्पवयीन मुले हे खाते स्वतःच्या नावाने उघडू शकतात. NRI या योजनेसाठी पात्र नाही.

किसान विकास पत्र कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी केले जाऊ शकते. तुम्हाला खात्यात नॉमिनीची सुविधाही मिळते. एवढेच नाही तर तुम्ही एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये खाती ट्रान्सफर करू शकता. शिवाय, किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकते.

गुंतवणुकीची मर्यादा नसल्यामुळे मनी लाँडरिंगचा धोकाही असतो, म्हणून सरकारने 2014 मध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीसाठी पॅन कार्ड अनिवार्य केले. 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास आयटीआर, सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंट यांसारखे उत्पन्नाचा पुरावाही सादर करावा लागेल. याशिवाय ओळखपत्र म्हणूनही आधार द्यायचा आहे. ही योजना 1988 मध्ये सुरू झाली. किसान विकास पत्रामध्ये गुंतवणुकीची सुविधा देशभरातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिस शाखांमध्ये उपलब्ध आहे.