1063663-pmkisan11thinstallment

Pm Kisan Yojna : शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून केंद्र सरकारने आपली महत्वाकांक्षी योजना म्हणजे pm kisan योजना 2018 साली सुरु केली. आतापर्यंत या योजनेद्वारे भरपूर शेतकऱ्याना लाभ मिळाला. या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये वर्ग केले जातात.

वास्तविक PM किसान सन्मान निधी योजनेची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बाराव्या हप्त्याच्या शोधात असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो. या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात बाराव्या हप्त्याचे पैसे येऊ शकतात. मात्र, ज्यांनी ई-केवायसी केलेले नाही. त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. तीही आता गेली.

5 सप्टेंबरपर्यंत खात्यात पैसे येऊ शकतात

पीएम किसान योजनेची माहिती देताना प्रधान सचिव डॉ. अरुण कुमार मेहता म्हणाले की 12 व्या हप्त्याचे 2,000 रुपये फक्त आधार लिंक केलेल्या खात्यात हस्तांतरित केले जातील. ते म्हणाले की, 5 सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणे अपेक्षित आहे. आपणास सांगतो की, यावेळी शासनाचे विशेष लक्ष अपात्र लाभार्थ्यांना मिळणारे लाभ थांबवणे आणि पैसे वसूल करणे हे आहे. आतापर्यंत 11 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. सध्या शेतकरी पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

वास्तविक, मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी. ही सरकारची अशी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातात. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये हस्तांतरित करते.