7th pay commission : केंद्र सरकार असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे की ज्याचा तब्बल लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. होय केंद्र सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेणार आहे.

दरम्यान महागाई भत्ता (DA) वाढण्याची वाट पाहत असलेल्या 2 राज्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्य कर्मचार्‍यांसाठी डीए 6 टक्क्यांनी वाढवण्यास सहमती दर्शवली. यापूर्वी तामिळनाडू सरकारनेही महागाई भत्त्याची घोषणा केली होती.

महाराष्ट्र सरकारची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) दिली. सीएमओच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांसाठी सुधारित डीए ऑगस्टपासून लागू होईल. सीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार, या वाढीनंतर महागाई भत्ता आता मूळ वेतनाच्या 34 टक्के करण्यात आला आहे.

छत्तीसगड सरकारची घोषणा

त्याचबरोबर छत्तीसगड सरकारनेही एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या निर्णयाचा राज्यभरातील ३.८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. दिनांक 2.05.2022 रोजी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्य शासनाकडून मे 2022 पासून 22 टक्के दराने सहाव्या वेतन आयोगात 174 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे.

या सुधारणेनंतर या वर्षीच्या १ ऑगस्टपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ७व्या आणि सहाव्या वेतन आयोगात ६ आणि १५ टक्के दराने वाढ होणार आहे. या वाढीमुळे राज्य सरकारच्या आर्थिक निधीवर 2160 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महासंघाने गेल्या महिन्यात त्यांच्या विविध मागण्यांसाठी पाच दिवसांचा संप केला होता, ज्यात महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता (एचआरए) वाढीचा समावेश होता.

तमिळनाडू सरकारनेही घोषणा केली

यापूर्वी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सरकारी कर्मचार्‍यांसाठी घोषणा करताना सांगितले की, 1 जुलै 2022 पासून राज्य सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल. या निर्णयाचा फायदा 16 लाख कर्मचाऱ्यांना होणार असून त्यासाठी 1,947.60 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार असल्याचेही ते म्हणाले. स्टॅलिन यांनी स्वातंत्र्यसैनिकांना 18,000 रुपये प्रति महिना वरून 20,000 रुपये प्रति महिना आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि स्वातंत्र्य चळवळीतील प्रख्यात नेत्यांच्या वंशजांना 9,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्याची घोषणा केली.