Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात घसरण कायम; जाणून घ्या आजचे दर

0 6

Mhlive24 टीम, 27 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये सोन्या – चांदीचे दरामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. भारतीय रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाले आहेत.

Advertisement

दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर 137 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दर वधारले आहेत. तज्ज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, परदेशी शेअर बाजारात झालेली घसरण आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे सोन्याचे भाव वाढलेले दिसून येऊ शकतात.

Advertisement

मदत पॅकेजची अपेक्षा तसेच अमेरिका आणि चीनमधील तणाव कायम राहिल्यामुळे सोने अजून खालच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर 137 रुपयांनी कमी होऊन 99.9 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 51,108 रुपये प्रति तोळा झाली आहे.

Advertisement

याआधीच्या सत्रात सोन्याच्या दराचे ट्रे़डिंग 51,245 रुपयांवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1903.6 डॉलर प्रति औंस आहेत. डॉलर इंडेक्समध्ये 0.1 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

Advertisement

चांदीचे नवे दर:-  मंगळवारी चांदीच्या दरात प्रति किलो 475 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. यानंतर चांदीचे दर 62,173 रुपये प्रति किलोग्रॅमवरून वाढून 62,648 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li