Post office Scheme : आजघडीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोस्ट बँकेकडे पाहिले जाते. पोस्ट ऑफीसदेखील आपल्याला भरपूर योजना देऊ करते, ज्यामध्ये सुरक्षिततेसोबत मजबूत फायदादेखील दिला जातो.

दरम्यान जर तुम्हाला तुमच्या बचतीतून जोखीम न घेता चांगला नफा मिळवायचा असेल, तर सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असेल. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुम्ही पोस्ट ऑफिस मुदत ठेव ठेवण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनांची निवड करू शकता. पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांच्या कालावधीत जमा करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

कर कपातीचा लाभ मिळवा 

पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर, तुम्हाला वार्षिक 6.7 टक्के व्याज दर मिळतो. व्याज दरवर्षी दिले जाते. परंतु त्याची गणना तिमाही आधारावर केली जाते. जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षांसाठी एकत्रितपणे दहा लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 13,94,067 रुपये मिळतील. व्याजातून 3,94,067 रुपये हमी मिळतील. पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटवर 5 वर्षांच्या आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार तुम्हाला कर कपातीचा लाभ देखील मिळतो. यामध्ये तुम्हाला १ लाख पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर कपातीचा लाभ मिळतो. यामध्ये तुम्हाला 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर परतावा म्हणून सुमारे 4 लाख रुपयांचा नफा मिळेल.

किती गुंतवणूक करता येईल 

या एफडीमध्ये किमान एक हजार रुपये गुंतवले जाऊ शकतात आणि त्यानंतर तुम्ही शंभर रुपयांच्या पटीत हव्या तेवढी गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस मुदत ठेव खाती 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी उघडली जातात. या तिन्ही मॅच्युरिटीजवर तुम्हाला ५.५ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे.

कोण खाते उघडू शकतो 

पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत, एक किंवा तीन प्रौढ व्यक्ती एकत्र खाते उघडू शकतात. त्याच पोस्ट ऑफिसमध्ये, अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक, कमकुवत मनाच्या व्यक्तीच्या वतीने पालक आणि 10 वर्षांवरील अल्पवयीन व्यक्ती स्वतःच्या नावावर त्यांचे खाते उघडू शकतात.