LPG gas cylinder prices : अबब ! दिवाळीपूर्वी महागाईचा मोठा झटका, गॅसच्या किमती तब्बल 265 रुपयांनी वाढल्या

MHLive24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून दिवाळीपूर्वी जनतेला पुन्हा एकदा महागाईचा जबर फटका बसला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅसच्या दरात वाढ केली असून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.(LPG gas cylinder prices )

मात्र, ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये झाली असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

दिल्लीत सिलेंडरची किंमत 1998 रुपयांपर्यंत वाढली

Advertisement

265 रुपयांच्या वाढीनंतर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1998 रुपयांवर गेली आहे, जी आधी 1733 रुपये होती. मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1950 रुपये आहे, तर यापूर्वी त्याची किंमत 1683 रुपये होती. आता कोलकातामध्ये 19 किलोचा गॅस सिलिंडर 2073.50 रुपयांना झाला आहे, तर चेन्नईमध्ये आता 19 किलोचा सिलेंडर 2133 रुपयांना मिळणार आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही दरात वाढ करण्यात आली होती

यापूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1 सप्टेंबरला 43 रुपयांनी आणि 1 ऑक्टोबरला 75 रुपयांनी वाढली होती.

Advertisement

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही दरात वाढ करण्यात आली होती

यापूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1 सप्टेंबरला 43 रुपयांनी आणि 1 ऑक्टोबरला 75 रुपयांनी वाढली होती.

गेल्या महिन्यात घरगुती गॅसच्या दरात वाढ झाली आहे

Advertisement

गेल्या महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती आणि सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजीच्या किमतीत 15 रुपयांनी वाढ केली होती. दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आता 899.50 रुपये आहे, तर 5 किलोच्या सिलेंडरची किंमत 502 रुपये आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker