share-market

Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता.

दरम्यान हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये ही उडी जूनच्या तिमाहीच्या निकालानंतर आली आहे, ज्यामध्ये कंपनीने तिच्या नफ्यात आणि तिमाहीत चांगली वाढ नोंदवली आहे.

हनीवेल ऑटोमेशन हे एकात्मिक ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रदाता आहे. कंपनीने 1 जानेवारी 1999 रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर आपला प्रवास सुरू केला आणि तेव्हापासून तिने आपल्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 450 पट वाढ केली आहे.

हनीवेल ऑटोमेशनचे शेअर्स आज म्हणजेच शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी 41,898 रुपयांवर बंद झाले. तर 1 जानेवारी 1999 रोजी त्याचे शेअर्स NSE वर 93 रुपयांच्या किंमतीला सूचीबद्ध झाले होते. अशा प्रकारे कंपनीच्या शेअर्सनी तेव्हापासून गुंतवणूकदारांना सुमारे ४४, ९५१.६१ टक्के परतावा दिला आहे.

शेअर किंमत इतिहास

हनीवेल ऑटोमेशनचे शेअर्स शुक्रवारी 41,898 रुपयांवर बंद झाले. एका महिन्यापूर्वी 20 जुलै 2022 रोजी NSE वर त्याच्या शेअर्सची किंमत 37626.35 रुपये होती. अशाप्रकारे गेल्या एका महिन्यात त्याची किंमत सुमारे 11.35 टक्क्यांनी वाढली आहे…

तर एक वर्षापूर्वी 20 ऑगस्ट 2021 रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 39.097.10 रुपये होती, जी आता 41,898 रुपये झाली आहे. अशा प्रकारे, कंपनीने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 7.16 टक्के परतावा दिला आहे. 5 वर्षांपूर्वी 1 सप्टेंबर 2017 रोजी त्याच्या शेअरची किंमत 13,334.05 रुपये होती. अशाप्रकारे, गेल्या 5 वर्षांत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 214.22 टक्के वाढ केली आहे.

10 वर्षांपूर्वी 24 ऑगस्ट 2012 रोजी हनीवेल ऑटोमेशनचे शेअर्स NSE वर सुमारे रु 2,534,90 वर व्यवहार करत होते. अशाप्रकारे, गेल्या 10 वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1552.85 टक्के इतका सुंदर मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

तर १ जानेवारी १९९९ रोजी त्याच्या शेअर्सची किंमत ९३ रुपये होती, जी आता ४१.८९८ रुपये झाली आहे. अशा प्रकारे, कंपनीने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 44,951.61 टक्के परतावा दिला आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 जानेवारी 1999 रोजी हनीवेल ऑटोमेशनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख रुपये आज सुमारे 4.5 कोटी रुपये झाले असते.

जून तिमाहीचे निकाल

जून तिमाहीत हनीवेल ऑटोमेशनचा निव्वळ नफा 11.5 टक्क्यांनी वाढून रु. 102 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत रु. 91.5 कोटी होता. त्याच वेळी, कंपनीचा महसूल जूनच्या तिमाहीत सुमारे 15 टक्क्यांनी वाढून 786.17 कोटी रुपये झाला, जो आधीच्या याच तिमाहीत 683 कोटी होता.