Share Market Update : गेल्या 3-5 वर्षांच्या खराब कामगिरीनंतर बँकिंग, वाहन आणि अभियांत्रिकी (विशेषतः संरक्षण कंपन्या) क्षेत्रातील कंपन्या आता तेजीच्या तयारीत असल्याचे शेअरखानचे गौरव दुआ यांचे मत आहे. पुढील काही वर्षांमध्ये यामध्ये वाढ दिसून येईल. गौरव दुआ यांना भांडवली बाजारातील २० वर्षांचा अनुभव आहे. भारतीय बाजारपेठेत साईडवेज कन्सोलिडेशन दिसेल असाही त्यांचा विश्वास आहे. मनीकंट्रोलशी बोलताना ते पुढे म्हणाले की 2023 आणि त्यानंतरचे कॅलेंडर वर्ष भारतीय बाजारपेठेसाठी खूप चांगले असेल.

सप्टेंबर तिमाहीच्या निकालांवर बोलताना ते म्हणाले की सलग आठ तिमाही मजबूत कॉर्पोरेट कमाईनंतर आता आर्थिक वर्ष 2023 ची दुसरी तिमाही काहीशी कमकुवत असू शकते. मात्र, गेल्या वर्षीचा आधार कमी असल्याने तो केवळ वार्षिक आधारावर चांगला दिसेल. कामगिरीच्या दृष्टीकोनातून, बँका, वाहन आणि अभियांत्रिकी कंपन्या सप्टेंबर तिमाहीत चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे, तर स्टील, सिमेंट आणि आयटी दबावाखाली असेल.

गौरव दुआ म्हणाले की, एक गुंतवणूकदार म्हणून ज्या कंपन्यांचा देशाच्या विकासात फायदा होण्याची शक्यता आहे आणि ज्यांचा या वाढीत मोठा वाटा आहे अशा कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणे शहाणपणाचे ठरेल. अशा क्षेत्रांमध्ये बँका, वाहन, रिअल इस्टेट आणि अभियांत्रिकी या क्षेत्रांचा समावेश होतो. देशाच्या अर्थव्यवस्थेतील संभाव्य बहु वर्षीय चढ-उताराचा या क्षेत्रांना फायदा होईल.

गौरव दुआ पुढे म्हणाले की गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून ते बँका, वाहन आणि अभियांत्रिकी (विशेषतः संरक्षण कंपन्या) वर उत्साही आहेत. गेल्या 3-5 वर्षांमध्ये कमी कामगिरी केल्यानंतर, ही क्षेत्र आता अनेक वर्षांच्या रॅलीसाठी सज्ज आहेत. या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक 18-24 महिन्यांच्या गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून केली पाहिजे. या क्षेत्रातील शेअर्स आपल्या पोर्टफोलिओच्या किमान 50-60 टक्के असले पाहिजेत.