Lpg gas cylinder rates : महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकांना दिलासा देणारी बातमी आहे. आज 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी झाली आहे. मात्र, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या दरात कपात केल्यानंतर राजधानी दिल्लीत १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत १७४४ रुपयांवर आली आहे. त्याच वेळी, कोलकाताची किंमत 1846 रुपये, मुंबईची किंमत 1696 रुपये आणि चेन्नईची किंमत 1893 रुपये आहे.

सलग पाचव्या महिन्यात किमतीत कपात

यापूर्वी राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1859.50 रुपये होती. कोलकात्याची किंमत 1959 रुपये, मुंबईची किंमत 1811.50 रुपये आणि चेन्नईची किंमत 2009.50 रुपये होती. ऑक्टोबर महिन्यातही 25.50 रुपयांनी दरात कपात करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात 91.50 रुपयांची घट झाली होती. ऑगस्ट महिन्यात 36 रुपयांची घट झाली होती. जुलै महिन्यात 8.50 रुपयांची घट झाली होती. अशाप्रकारे, हा सलग पाचवा महिना आहे जेव्हा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 1053 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे. 6 जुलै रोजी किंमत शेवटची बदलली होती. त्या दिवशी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.