MHLive24 टीम, 04 जानेवारी 2022 :- Tax benefits to Senior Citizens: सामान्य लोकांच्या तुलनेत, ज्येष्ठ नागरिक आणि अतिशय ज्येष्ठ नागरिकांना करात अनेक फायदे मिळतात.

1. कर सूट मर्यादा

सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक वर्षात केवळ अडीच लाख रुपयांची सूट मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्षांपेक्षा जास्त) ही मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत आहे.

तर अतिशय ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्षांपेक्षा जास्त) ही मर्यादा ५ लाख रुपये आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत असेल तर त्यावर टीडीएस कापला जाणार नाही. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत आहे.

2. रु. 50,000 पर्यंत मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम

आयकराच्या कलम 80D अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांनी भरलेला 50,000 रुपयांपर्यंतचा मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम डिडक्शन म्हणून दिला जातो. तर सर्वसामान्यांसाठी ही मर्यादा केवळ २५ हजार रुपये आहे.

3. एक लाखापर्यंत मेडिकल डिडक्शनचा दावा

कलम 80DDB अंतर्गत, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक काही आजारांमुळे 1 लाख रुपयांपर्यंत मेडिकल डिडक्शनचा दावा करू शकतात. तर 60 वर्षांपर्यंतच्या लोकांसाठी ही मर्यादा केवळ 40 हजार रुपये आहे.

4. बँक खात्यावरील व्याजावरील डिडक्शन क्लेम

60 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला बचत खात्यावरील व्याजातून 10,000 रुपयांपर्यंतच्या डिडक्शन क्लेम करण्याची परवानगी आहे. तर ज्येष्ठ नागरिक बँका किंवा पोस्ट ऑफिस बँकांमधील बचत आणि मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर 50,000 रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकतात.

5. ई-फायलिंगमध्ये सूट

जर खूप ज्येष्ठ नागरिकांनी आयटीआर-१ किंवा आयटीआर-४ मध्ये रिटर्न भरले, तर त्यांना त्यासाठी ई-फायलिंग करण्याची गरज नाही. रिटर्न फक्त पेपर मोडमध्ये भरता येईल.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit